Accident : निलंगा-औरादशहाजानी महामार्गावर भीषण अपघातात चौघांचा मृत्यू, तर दोन गंभीर जखमी

चाकूर येथील कुटूंब बस्वकल्याणला कारमध्ये जात असतांना चालकाचा ताबा सुटल्याने खोल अंदाजे तीस फुटाच्या खड्यात कोसळून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला.
Accident
Accidentsakal
Summary

चाकूर येथील कुटूंब बस्वकल्याणला कारमध्ये जात असतांना चालकाचा ताबा सुटल्याने खोल अंदाजे तीस फुटाच्या खड्यात कोसळून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला.

निलंगा - निलंगा ते औरादशहाजानी या महामार्गावर शुक्रवारी ता. २४ रोजी दुपारच्या सुमारास मुलीच्या लग्नाची तारीख निश्चित करण्यासाठी चाकूर येथील कुटूंब बस्वकल्याणला लाल रंगाची (ईटॉस) कारमध्ये जात असतांना चालकाचा ताबा सुटल्याने खोल अंदाजे तीस फुटाच्या खड्यात कोसळून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. मयतामध्ये पती-पत्नीचा समावेश आहे.

याबाबतची माहीती अशी की, आनंदनगर चाकूर येथील एक कुटूंब आपल्या मुलीच्या विवाहाची तारीख निश्चित करण्यासाठी बस्वकल्याणला कार क्रमांक एम.एच. २४ ए. एफ. १८४५ या इटाॕस कारने जात होते. निलंगा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या एका पुलावरील जंपिंग चालकांच्या लक्षात न आल्याने वेगात असलेली गाडी थेट खोल खड्यात जावून कोसळली गाडी फरफटत पन्नास फुट अंतरापर्यंत गेली आहे. त्यानंतर गाडी फरफटत जवळपास पन्नास फुट गेली आहे. ही घटना चिखल ओढ्यामध्ये जाऊन कार पलटी झाली. त्यामुळे हा भीषण अपघात झालेला असून दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी ही घटना घडली आहे.

Accident
Sambhaji Nagar News: पोपट पकडायला गेला अन् झाला ‘पोपट’!

या भिषण आपघातात भगवान मोतीराम सावळे वय ५२, लता भगवान सावळे वय ४८, राजकुमार सुधाकर सावळे ३७, विजयाबाई भाऊराव सावळे वय ५४ सर्व रा. आनंदनगर चाकूर या चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर शुभम सुनील सावळे वय ७ वर्षे, महेश भगवान सावळे वय १९ रा. पेठ मुहला चाकूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर निलंगा येथे उपचार करून लातूर येथे पाठवले आहे. या आपघाताची माहीती कळताच निलंगा पोलिस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ, पोलिस उपनिरीक्षक श्री. गर्जे यासह अनेक नागरिकांनी धाव घेतली होती मोठ्या प्रमाणात नागरिक यावेळी आले होते. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

या ठिकाणी तिसरा अपघात

सध्या निलंगा ते औरादशहाजानी या महामार्गाचे काम झाले असून या पुलावर जंपिंग असल्याने वेग अति असणाऱ्या गाड्या नियंत्रणात येत नाही त्यामुळे येथे यापूर्वी तिन अपघात झाले असून हा सर्वात मोठा आजचा अपघात असाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com