

Nilanga Drought Crisis
esakal
निलंगा : पेरणीला हजारो रूपये खर्च केला, बोअर आटला, साठ फूट खोल असलेली विहीर कोरडी पडली, पिण्यासाठी पाणी नाही, जनावराना चारा नाही... बाजारात नेलं तर कोणी घेत नाही.. 72 पेक्षाही भीषण दुष्काळ आहे, सोयाबीन, उडीद, तुर करपून गेलं, लेकराचे शिक्षण कसं करावं, लाख रुपये दिले तरी आमचे नुकसान भरून येणार नाही... साहेब आता तुम्हीच आम्हाला वाचवा... सगळं गेलं आता जगायचं कसं अशी निराशा जनक प्रतिक्रिया जाऊ ता. निलंगा येथील शेतकरी नूर बाबा मिया पटेल यानी मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त करीत हाता.. पाया.. पडत ढसाढसा रडला मुख्यमंत्र्यांनीही त्यांना धीर देत थेट आपल्या गळ्याला लावून घेतले आणि सरकार शेतकऱ्यांना भरीव मदत करेल असे आश्वासन दिले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाऊ ता. निलंगा येथील दुष्काळी भागाचा पाणी दौरा करण्यासाठी आले होते त्यांनी अक्षय कुमार हिरास यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाणी केली त्यानंतर नूर पटेल यांच्या विहिरीची पाहणी केली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले, माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, संजय बनसोडे, आमदार बसवराज पाटील मुरूमकर, आमदार अभिमन्यू पवार, खासदार ओमराजे निंबाळकर आदी उपस्थित होते प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी सोयाबीन पिकाची पाहणी केली हे पीक पूर्णतः वाया गेले आहे.
उपस्थित शेतकऱ्यांनी हातात करपून गेलेली पिके, वाळलेला ऊस मुख्यमंत्र्यांना दाखवला गेल्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती यंदा कोर्टात दुष्काळ पडला आहे सर्वच पिके हातून गेली आहेत. आता आम्ही जगावं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सकाळी परिस्थितीशी पाहणी केली यावेळी अतिशय पावसाअभावी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून काही भागात 50 टक्के पेक्षा कमी पाऊस झाल्याने संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे जनावराच्या पाण्याचा प्रश्न बिकट बंद आहे विहीर विंधन बोर बंद पडले आहेत अशा भीषण परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांना काय मदत करणार याकडे लक्ष लागले आहे.
नूर नूर बाबामिया पटेल या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्याच्या गळ्याला पडून टाहो फोडला सोयाबीन करपलं साहेब बोर आटला विहीर कोरडी पडली आता जगायचं कसं म्हणून हंबरडा फोडला मुख्यमंत्री आणि त्यांना गळ्याला लावून धीर देण्याचा प्रयत्न केला यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते अनेक महिला शेतकरीनेही मुख्यमंत्र्यांसमोर दुष्काळी परिस्थितीच्या व्यथा मांडल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नूर पटेल यांच्या विहिरीची ही पाहणी केली शेतातील सोयाबीन तूर या पिकाची पाहणी त्यांनी यावेळी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.