

Pimpri Chinchwad Heavy Rain
esakal
चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे बहुतांश रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. त्यातून वाट शोधताना वाहनचालकांना कसरत करावी लागली.
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराला सलग दुसऱ्या दिवशी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सायंकाळी सहाच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने सुमारे एक तास तुफान १०४.५ मिलिमीटर इतकी बॅटिंग केली. विजांच्या कडकडाटासह व वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे नोकरदार आणि वाहनचालकांची मोठी धांदल उडाली. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे तापमानाचा पारा वाढला होता.
सोमवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सोमवारी सुमारे अर्धा ते एक तास झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले होते. रस्त्यावरही पाणी साचल्याने वाहतूक विस्कळित झाली होती. एक तासातच ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर संततधार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी पाचनंतर वातावरणात अचानक बदल होऊ लागला.
काळ्या ढगांनी संपूर्ण शहर व्यापले आणि काही क्षणांतच वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने शहराच्या अनेक भागांत पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. मुख्य चौकांमध्ये आणि सखल भागांत पाणी साचल्यामुळे दुचाकीस्वारांची दमछाक झाली. विशेषतः पिंपरी, काळेवाडी आणि निगडी परिसरामध्ये काही काळ वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. शहरातील प्रमुख चिंचवडमध्ये नागरिकांची दैना चिंचवड : परिसरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.
यामुळे चिंचवडगाव, चिंचवड स्टेशन, वाल्हेकरवाडी, दळवीनगर, काळभोरनगर, केएसबी चौक आणि थरमॅक्स चौक परिसर जलमय झाला. यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची धांदल उडाली. याचा परिणाम गतीवर झाला आणि वाहतूक संथ गतीने सुरू होती. या पावसाने उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी नागरिकांची दैना झाली.
रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक चौकांमध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पावसामुळे पादचारी आणि कार्यालयातून घरी परतणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यालगत व्यवसाय करणारे छोटे व्यापारी, फेरीवाले आणि हातगाडी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांनी आपला माल वाचवण्यासाठी धावपळ केली. काही ठिकाणी दुकानांमध्येही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.