निलंग्याचे तहसिलदार लाचप्रकरणी अटकेत

वाळूचे ट्रक नियमित चालू देण्यासाठी एजंटाकरवी दीड लाखाची लाच घेतल्याप्रकरणी निलंग्याचे तहसिलदार व पैसे घेणारा एजंटालाही येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी अटक केली.
Ganesh jadhav
Ganesh jadhavSakal
Summary

वाळूचे ट्रक नियमित चालू देण्यासाठी एजंटाकरवी दीड लाखाची लाच घेतल्याप्रकरणी निलंग्याचे तहसिलदार व पैसे घेणारा एजंटालाही येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी अटक केली.

लातूर - वाळूच्या ट्रक नियमित चालू देण्यासाठी एजंटाकरवी दीड लाखाची लाच घेतल्याप्रकरणी निलंग्याचे तहसिलदार व पैसे घेणारा एजंटालाही येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी शनिवारी (ता. चार) अटक केली आहे. या प्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती या विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

यातील तक्रारदाराचा वाळू विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना वाळूच्या ट्रक नियमितपणे चालवू देण्यासाठी व वाळूच्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी प्रती ट्रक तीस हजार रुपये प्रमाणे दोन ट्रकचे साठ हजार प्रति महा असे मागील तीन महिन्याचे एक लाख ८० हजार रुपयाची लाचेची मागणी निलंग्याचे तहसिलदार गणेश दिगंबरराव जाधव व एजंट रमेश गुंडेराव मोगरगे (रा.शेंद, ता.निलंगा) केली होती.

प्रत्यक्ष लाच मागणी करून तडजोडी अंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले होते. ही रक्कम तहसिलदार जाधव याने एजंट रमेश मोगेरगे याच्याकडे देण्यासाठी तक्रारदाराला सांगितले होते. दरम्यानच्या काळात तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे या संबंधी तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी सापळा लावला. या प्रकरणातील एजंट रमेश मोगेरगे याने निलंगा येथे तहसिलदार जाधव याच्या घरासमोरच लाचेची मागणी करुन दीड लाख रुपये पंचासमक्ष स्वीकारले. त्यानंतर पोलिसानी तहसिलदार जाधव व मोगरगे या दोघाना अटक केल आहे. हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस उपअधिक्षक पंडित रेजितवाड, पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली, अन्वर मुजावर आदींनी पुढाकार घेतला.

कोणत्याही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तींनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ लाच लुचपत प्रतिबंध कार्यालय दुरध्वनी (02382-242674), पोलिस उपअधिक्षक पंडित रेजितवाड (9309348184) व @ टोल फ्री क्रमांक 1064 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाचव्या वेळेस सापडले जाळ्यात

या प्रकरणातील तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे ता. २५ मे रोजी तहसिलदार जाधव लाच मागत असल्याची तक्रार दाखल केली होती. त्या वेळेस पासून लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस कामाला लागले होते. त्यानंतर ता. २६ मे, ता. २८ मे, ता. ३० मे आणि ता. ३१ मे रोजी पोलिसांनी लाच मागणीची पडताळणी केली होती. त्यानंतर पाचव्या वेळेस शनिवारी (ता. चार) दीड लाखाची लाच घेतली गेली. त्यामुळे या दोघानाही पोलिसांनी अटक केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com