जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्या सभापतिपदाचे आरक्षण जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

औरंगाबाद- जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. चार) आरक्षण सोडत काढण्यात आली. फुलंब्री आणि सिल्लोड या दोन पंचायत समित्यांचे सभापतिपद खुल्या प्रवर्गासाठी आहेत. तर गंगापूर पंचायत समिती अनुसूचित जाती व वैजापूर अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात पंचायत समित्या सभापतिपदाच्या आरक्षणासाठी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी विश्‍वंभर गावंडे, देवेंद्र कटके, तहसीलदार राजू शिंदे यांची उपस्थिती होती. राज्य शासनाने 2011 च्या जनगणनेनुसार ठरवून दिलेल्या आरक्षणाप्रमाणे सभापतिपदाचे आरक्षण काढण्यात आले. गंगापूर पंचायत समिती सभापती अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाले. वैजापूर सभापतिपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झाले. सोडत काढताना विद्यमान सभापती, पंचायत समितीसाठी इच्छुकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गर्दी केली होती. 

पंचायत समित्या....................2017 साठी निश्‍चित झालेले आरक्षण 
औरंगाबाद............................. सर्वसाधारण (महिला) 
पैठण.................................. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 
फुलंब्री................................. सर्वसाधारण 
सिल्लोड................................ सर्वसाधारण 
कन्नड................................... सर्वसाधारण महिला 
सोयगाव................................. नागरिकांचा मागास प्रवर्ग 
वैजापूर..................................अनुसूचित जमाती (महिला) 
गंगापूर..................................अनुसूचित जाती 
खुलताबाद............................. सर्वसाधारण महिला 

Web Title: nine panchayat committee reservations announced