नरेंद्र मोदींच्या सभेनंतर परतणारी व्हॅन उलटून नऊ पोलिस जखमी

सिरसाळा : पोलिस व्हॅनला झालेला अपघात.
सिरसाळा : पोलिस व्हॅनला झालेला अपघात.

सिरसाळा (बीड) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या बंदोबस्तावरुन बीडकडे परत येत असलेली पोलिस व्हॅन रॉड तुटल्याने पलटी होऊन रस्त्याच्या खाली कोसळली. या अपघातात नऊ पोलिस जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता. 17) साडेपाच वाजता बीड - परळी राज्य मार्गावरील सिरसाळा - दिंद्रुड रोडवर घडली.

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होती. सभेसाठी तगडा पोलिस बंदोबस्त लावला होता. दरम्यान, सभा संपल्यानंतर बंदोबस्तासाठी गेलेले जिल्हा पोलिस दलातील आरसीपीचे जवान एका व्हॅनमधून बीडकडे येत होते. बीड - परळी रोडवर सिरसाळा ते दिंद्रुडदरम्यान पोलिस व्हॅनचा रॉड तुटल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत व्हॅन बाजुने एका झाडाकडे वळविली. झाडावर आदळून पलटी होऊन रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यात पडली. त्यात 16 कर्मचाऱ्यांपैकी नऊ पोलिस जखमी झाले. यामध्ये व्हॅनचालकाच्या नाकाला गंभीर जखम व एकाचा पाय फ्रॅक्‍चर झाला. यासह इतरांनाही मुका मार लागला आहे.

जखमींमध्ये चालक अशोक कदम व अमोल दयानंद राऊत, जिवा शिवाजी गंगावणे, आकाश सुदमराव यादव, भैयासाहेब विठ्ठलराव निसर्गने, वैजीनाथ खंडुजी तनपुरे या सहा जणांचा समावेश आहे. त्यांना जिल्हा रग्णालयात दाखल केले. राहुल घाडगे, सुशांत गायकवाड व शिवाजी राख यांना माजलगाव रुग्णालयात नेण्यात आले. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन कर्मचाऱ्यांनी विचारपूस केली.

विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली मदत

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे सिरसाळा परिसरातून जात होते. याच दरम्यान पोलिस व्हॅनला अपघात झाला. धनंजय मुंडे यांनी व्हॅनमधून जखमींना बाहेर काढत तत्काळ मदत केली. त्यांना माजलगाव व जिल्हा रुग्णालयात पाठविण्याची सोय केल्यामुळे जखमींना तत्काळ सेवा मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com