Aadul News : लिंबाच्या झाडाखाली आजोबासह थांबलेल्या नऊ वर्षिय बालकाचा विजेच्या आवाजाने मृत्यु

पावसामुळे लिंबाच्या झाडाखाली अडोशाला आजोबासह थांबलेल्या एका नऊ वर्षीय शाळकरी मुलाचा ते उभे असलेल्या काही अंतरावर विज पडली.
lightning
lightningsakal

आडूळ - जोराचा वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह अचानक आलेल्या पावसामुळे लिंबाच्या झाडाखाली अडोशाला आजोबासह थांबलेल्या एका नऊ वर्षीय शाळकरी मुलाचा ते उभे असलेल्या काही अंतरावर विज पडली.

बाजुलाच विज पडल्याचा मोठा आवाज झाल्याने भेदरलेल्या या चिमुकल्याचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २४) सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास आडूळ खुर्द, ता. पैठण शिवारात घडली. सिद्धेश्वर अंकुश पाचे (वय-९ वर्षे) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

आडूळ खुर्द येथील शेतकरी एकनाथ सांडू पाचे यांची धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत गट क्रमांक २९ मध्ये शेती असून ते या शेतात आज दुपारी सिद्धेश्वरची शाळा सुटल्यानंतर दोन नातवासह असे तिघे जण शेतात गेले होते.

सायंकाळच्या सुमारास आडुळ येथे अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने तिघेही लिंबाच्या झाडाखाली आडोशाला थांबले होते. नेमके याच वेळी ते ज्या झाडाखाली थांबले होते त्यांच्या काही अंतरावर असलेल्या दुसरया एका झाडावर मोठी वीज कडाडली. या विजेच्या मोठ्या आवाजाने झाडाखाली थांबलेल्या सिद्धेश्वर अंकुश पाचे या शाळकरी मुलाचा घाबरून दुर्दैवी मृत्यू झाला.

त्याच्यासोबत त्याचे आजोबा एकनाथ पाचे व सिद्धेश्वर ची मोठी बहीण राणी अंकुश पाचे हे दोघे मात्र या घटनेत बालंबाल बचावले. घटना घडल्यानंतर सिध्देश्वर ला छञपती संभाजीनगर येथील शासकिय दवाखान्यात नेण्यात आले माञ येथील डॉक्टरांनी तपासुन मयत घोषित केले. सिद्धेश्वर हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील व दोन बहिणी असा परिवार आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com