मिटमिट्यातील मच्छिंद्रनाथ मठास नितीन गडकरींची भेट 

aurangabad
aurangabad

औरंगाबाद : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि बंदर विकासमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी (ता. 22) नागपुरहून खाजगी विशेष विमानाने सकाळी मिटमिटा येथील मच्छिंद्रनाथ मठास भेट दिली. 16 ऑक्‍टोबरपासून मठात नवनाथ महायज्ञ व अतिरुद्र स्वाहाकार यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.याच पुजेसाठी श्री.गडकरी संपुर्ण कुटुंबासह मठात आले होते. पुजा करून सकाळी साडे अकरा वाजेदरम्यान गडकरी मुंबईकडे रवाना झाले. 

मिटमिट्यातील श्री. प्रतिष्ठान ट्रस्ट संचालित मच्छिन्द्रनाथ मंदिर व योग्य उपासना केंद्रात 16 ते 25 ऑक्‍टोबंर दरम्यान महायज्ञ होणार आहे. 
नितीन गडकरी यांच्या सोबत दोन्ही मुले, पत्नी,सुना हे आले होते. तर आमदार अतुल सावे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, संजय केणेकर, ज्ञानोबा मुंढे, बाळासाहेब गायकवाड, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार संजय शिरसाट यांची उपस्थिती होती. पावणे दहा वाजता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मठात महायज्ञात डॉ. मंगलनाथ महाराज यांच्या उपस्थितीत सहभाग घेतला पुजा केली. व शुभेच्छा दिल्यानंतर ते कुटुंबियासह चिकलठाणा आंतरराष्ट्रीया विमानतळावरून विमानाने मुंबईकडे रवाना झाले. नितिन गडकरी दरवर्षी या मठास भेट देत असतात. यंदाही ही भेट आणि पुजा केली असल्याची माहिती आयोजकांनी दिली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com