जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील बिनविरोध 

प्रकाश बनकर
गुरुवार, 13 जून 2019

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीच्या दिवशी नितीन पाटील सोडता एकही अर्ज न आल्याने अध्यक्षाची माळ नितीन पाटील यांच्या गळ्यात पडली.

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या जागेसाठी गुरुवारी (ता. 13) निवडणूक पार पडली. यात अध्यक्षपदासाठी माजी आमदार नितीन पाटील यांना एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या या अध्यक्षपदासाठी जेष्ठ संचालकांनीही हालचाली केल्या होत्या. मात्र निवडणूकीच्या दिवशी नितीन पाटील सोडता एकही अर्ज न आल्याने अध्यक्षाची माळ नितीन पाटील यांच्या गळ्यात पडली.
अध्यक्षपदासाठी सहानुभूती म्हणून माजी आमदार नितीन पाटील यांच्या नावाची चर्चा होती, मात्र मध्यंतरी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, रामकृष्णबाबा पाटील, आमदार संदिपान भुमरे यांचीही नावे चर्चेत होती. विधानसभा अध्यक्षांनी नकार दिल्याने नकार दिल्यामुळे इतर कोणीही अर्ज भरण्यासाठी पुढे आले नाही. यामुळे नितीन पाटील यांचा मार्ग मोकळा झाला.

अध्यक्षाच्या निवडणुकीत नितीन पाटील यांच्या नावाने दोन अर्ज आले. इतर कुठलाही अर्ज न आल्यामुळे अध्यासी अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी नितीन पाटील यांची बिनविरोध निवड घोषित केली.
तीन महिन्यापासून हे पद रिक्त होते. सुरेश पाटील यांनी सर्वपक्षीय संचालक यांना सोबत घेऊन ही बँक तोट्यातून नफ्यात आली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Patils elected as president of District Bank at aurangabad