esakal | केळी घेता का हो केळी! शेतकऱ्यावर केळी खरीदार शोधण्याची आली वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

कळमनुरी (जि.हिंगोली) तालुक्यातील डोंगरकडा, वारंगा फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी केळी उत्पादक मोठ्या प्रमाणावर आहेत.

केळी घेता का हो केळी! शेतकऱ्यावर केळी खरीदार शोधण्याची आली वेळ

sakal_logo
By
मुजाहेद सिद्दीकी

वारंगा फाटा (जि.हिंगोली) : शेतकऱ्यांचे (Farmer) उत्तम नगदी पीक असलेल्या केळी पिकाला खरेदीदार मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांवर (Banana Grower Farmers In Hingoli) केळी घेता का हो केळी, असे म्हणण्याची वेळ आली आहे. कळमनुरी (Kalamnuri) तालुक्यातील डोंगरकडा, वारंगा फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी केळी उत्पादक मोठ्या प्रमाणावर आहेत. या भागातून इसापूर धरणाचा कालवा जातो. त्याचा या शेतकऱ्यांना लाभ होतो. केळी पीक (Banana) हे उत्तम नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांत प्रचलित आहे. हे पीक घेण्यासाठी खर्च देखील मोठ्या प्रमाणात करावा लागतो. दरम्यान या भागात या वर्षी देखील मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड झाली आहे. सध्या (Marathwada) केळी पिकावर आलेल्या अज्ञात रोगामुळे केळीचे झाड पुर्णतः पिवळे पडुन पिकत आहेत. सततच्या झालेल्या पा‌वसाने केळी बागा पिकत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

हेही वाचा: औरंगाबादेत ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा रास्ता रोको, आंदोलक ताब्यात

मागील एक महिना पूर्वी केळीचे दर ९०० ते १३०० रूपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळत होते. ते दर आजघडीला कमी होऊन केवळ ३०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे मिळत असुन देखील व्यापारी खरेदी करण्यास तयार होत नाहीत. सध्या कमी झालेल्या दरामुळे लागवड खर्च ही निघेनासा झाला असल्याचे केळी उत्पादक सांगत आहेत. उद्भवलेल्या परिस्थितीमुळे केळी उत्पादक शेतकरी मात्र हातबल झाल्याचे दिसुन येत आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने मदत करण्याची मागणी केळी उत्पादक शेतकरी करीत असल्याचे चित्र आहे.

loading image
go to top