एटीएममध्ये पुन्हा ठणठणाट! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - नोटाबंदीनंतर काही प्रमाणात परिस्थिती जानेवारी महिन्यात पूर्ववत होण्यास सुरवात झाली होती. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या दहा तारखेपासून पुन्हा बॅंकांना चलन तुटवड्याला सुरवात झाली. बॅंकांच्या तिजोऱ्यांतही पुरेसे पैसे शिल्लक नसल्याने एटीएमवरही रोखीचा ठणठणाट आहे. 

चलन टंचाईमुळे औरंगाबादेतील सातशेपैकी निम्मे एटीएम गेल्या आठवडाभरापासून कधी बंद, तर कधी सुरू अवस्थेत आहेत. बॅंकांच्या काउंटरवरही ग्राहकांना रोख रक्कम देताना अडचणी येत आहेत. रोख उपलब्ध असलेल्या एटीएमच्या शोधात नागरिकांना फिरावे लागतेय. गेल्या काही दिवसांपासून कॅशचा तुटवडा जाणवत आहे. एटीएम आणि बॅंक काउंटर यांना रोज किमान चारशे कोटींची आवश्‍यकता आहे. पण रिझर्व्ह बॅंकेकडून शहरासाठी तुलनेत कमी रोकड मिळत आहे. करन्सी चेस्टकडूनही विविध बॅंकांना रोज किमान 25 लाख ते 40 लाखापर्यंतच कॅश पुरवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अनेक बॅंकांनी रिझर्व्ह बॅंकेकडे चलनाची मागणी केली आहे. बॅंकांमध्ये जमा होणारे वेतन विचारात घेता शहरात सुमारे पाच हजार कोटी रुपयांची गरज असल्याचे एसबीआय, एसबीएच, बॅंक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या शहरात स्टेट बॅंक ऑफ इंडिया, स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद, बॅंक ऑफ महाराष्ट्र, पंजाब बॅंक आणि बॅंक ऑफ इंडियामध्ये करन्सी चेस्ट आहेत. या करन्सी चेस्टला पुरेशा रकमेची प्रतीक्षा असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no casj in atm