शिरूर बसस्थानकात पिण्यासाठी पाणीच नाही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

शिरूर कासार - शिरूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात पाण्याची सुविधाच नसल्याने प्रवाशांसह वाहतूक नियंत्रकाला पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागते. याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. 

शिरूर कासार - शिरूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात पाण्याची सुविधाच नसल्याने प्रवाशांसह वाहतूक नियंत्रकाला पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागते. याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील बसस्थानकाचा कारभार पाटोदा आगारप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो. शहरात उपबसस्थानक असून येथील कारभार वाहतूक नियंत्रकांमार्फत चालतो. येथे दररोज 26 बसफेऱ्या असतात. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यातच सध्या लग्नसराई असल्याने बसस्थानकात मोठी गर्दी होत आहे. पण येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. पिण्याच्या पाण्याकरिता हौद आहे, पण येथे पाणीच भरले जात नाही. बसस्थानकाच्या जवळपास पाणी मिळत नसल्याने प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांनाही दूरवरून पाणी विकत आणून तहान भागवावी लागते. 

बसस्थानकात पाण्याची सोय करण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. येथे पाणीच नसल्याने शहरातील हॉटेलमधून पाणी विकत घ्यावे लागते. 
- बारीकराव खेंगरे, प्रवासी 

बसस्थानकात पाण्यासाठी हौदाची सोय केली आहे. पण पाण्यासाठी नगरपंचायतीने बसस्थानकात नळ कनेक्‍शन दिले तर पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. 
- ए. एस. सानप, प्रभारी वाहतूक नियंत्रक, शिरूर कासार. 

Web Title: No drinking water in Shiroor bus stand MSRTC