हमी योजनेच्या मजूरीची हमी मिळेना

हमी योजनेच्या मजूरीची हमी मिळेना

हिंगोली : सिरसम बुद्रुक (ता. हिंगोली) येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जयपूर बॅरेजेसवरून पुरक नळ योजना द्यावी अशी मागणी करीत हमी योजनेच्या कामावरील मजुरांना मजूरीची हमी नसल्याचे सांगत गावकऱ्यांनी पालक सचिव नितीन गद्रे यांच्यासमोर गुरुवारी (ता. 16) गाऱ्हाणे मांडले. 

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची पाहणी करण्यासाठी पालक सचिव गद्रे हिंगोली दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी हिंगोली तालुक्यातील सिरसम बुद्रुक, पेडगाववाडी, कनका, कळमनुरी तालुक्यातील गावांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी सिरसम बुद्रुक येथे सरपंच शिवाजी लोथे, ग्रामसेवक खिस्ते, तलाठी सय्यद अय्युब, विठ्ठल लोथे, अशोक पवार, रामू लोथे, ज्ञानेश्वर मस्के, माणिक गवळी, मारोती लोथे, नामदेव लोथे, किसन गवळी, गजानन पवार, बंडू चंद्रवंशी, आभानराव पवार, बाबाराव पवार यांच्यासह गावकरी उपस्थित होते. 

यावेळी गद्रे यांनी टँकर वेळेवर येते किंवा नाही याची विचारणा त्यांनी गावकऱ्यांकडे केली. त्यावर गावकऱ्यांनी टँकर येत, मात्र गावाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जयपूर, सागद बॅरेजेस वरून पुरक पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याची मागणी केली. यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीची कामे ठप्प आहेत. मजूरांच्या हाताला काम नाही, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधे कामे केल्यानंतरही मजुरी मिळण्याची हमी नसल्याचा आरोप मजूरांनी केला आहे. मजूरीच्या मागणीसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचा आरोपही केला. त्यामुळे हमी योजनेची कामे सुरु करावे अशी मागणी मजूरांनी यावेळी केली. हमी योजनेच्या मजूरीच्या प्रश्नासोबतच पाणी योजने संदर्भात अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत सुचना देण्याचे आश्वासन गद्रे यांनी दिले आहे. त्यामुळे पालक 
सचिवांकडून पाणी योजना मंजूर होणार का याकडे गावकऱ्यांचे लक्ष 
लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com