esakal | शरद पवार कृषी विधेयकावर बोलले; मालाच्या किंमतीची गॅरंटी नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध
sakal

बोलून बातमी शोधा

1Sharad_Pawar_10

ॲमेझॉन, रिलायन्स सारख्या मोठ्या कंपन्या आज माल शेतकऱ्यांकडून घेतील. स्थानिक स्पर्धा संपवतील. त्यानंतर या कंपन्या म्हणतील त्या किमतीला माल विकायला भाग पाडतील, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी कृषी विधेयकांवर बोलताना सांगितले.

शरद पवार कृषी विधेयकावर बोलले; मालाच्या किंमतीची गॅरंटी नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध

sakal_logo
By
ई सकाळ टीम

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : ॲमेझॉन, रिलायन्स सारख्या मोठ्या कंपन्या आज माल शेतकऱ्यांकडून घेतील. स्थानिक स्पर्धा संपवतील. त्यानंतर या कंपन्या म्हणतील त्या किमतीला माल विकायला भाग पाडतील, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी कृषी विधेयकांवर बोलताना सांगितले. तुळजापूर येथे सोमवारी (ता.१९) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


श्री.पवार म्हणाले, आपल्याकडे बाजार समितीत माल कुठेही विकायची मुभा होती. गहू, तांदूळाच्या किमान हमीभाव मंत्रिमंडळ निर्णय घ्यायचे. आता मालाच्या किंमतीची गॅरंटी राहणार नाही, यामुळे शेतकऱ्यांचा विरोध आहे. कृषी विधेयकातील काही गोष्टींवर लोकांचा विरोध आहे. हा विरोध कुठे दिसतो पंजाब, हरियाणा आणि पश्‍चिम उत्तर प्रदेशमध्ये. लोक ट्रॅक्टर वगैरे घेऊन रस्त्यावर आलेत.

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शरद पवार म्हणाले, पक्षाबद्दल विश्वास वाटत असेल तर काय करायचे!

या देशामध्ये गहू आणि तांदूळ खरेदी सरकार म्हणजे भारतीय खाद्य निगमच्या वतीने केली जाते. त्याचा मी दहा वर्षे अध्यक्ष होतो. आज सगळ्यांना बाजार खुले केले. त्याला आमचा विरोध नाही. लातूर व उस्मानाबाद येथील द्राक्ष महाराष्ट्र बाहेर जात होते. त्यावर कोणी बंधने घातले नाही. मनमोहन सिंगांनी उदारीकरणाचा निर्णय घेतला. त्यावेळी भाजपने छोटे दुकानदारांना एकत्र करुन आंदोलन केले होते. तसेच आंदोलन आता शेतकरी करित आहेत.

गप्प बसवत नाही
महाराष्ट्रात कोणतेही संकट आले की अगोदर शरद पवार येतात. नंतर मुख्यमंत्री व इतर लोक येतात अस का? असा प्रश्‍न पत्रकार परिषदेत विचारला असता श्री पवार म्हणाले, मला गप्प बसवत नाही म्हणून येत असतो. मुख्यमंत्र्यांना अनेक शासकीय निर्णय घ्यावी लागत असतात. त्यासाठी बैठका घेतात. त्यामुळे त्यांना मुंबईतच थांबण्याचा आग्रह आम्ही केला, असे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अद्यापही नुकसान पाहणी का करत नाही असा प्रश्‍न विचारले असता त्यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर