esakal | लातुरात निर्बंधांबाबत शिथिलता नाही, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी

लातुरात निर्बंधांबाबत शिथिलता नाही, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : जिल्ह्यात (Latur) कोविड-१९ च्या अनुषंगाने लागू करण्यात (Corona) आलेल्या निर्बंधांबाबत जिल्हा प्राधिकरणाने कोणत्याही प्रकारची शिथिलता दिलेली नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. (IAS Prithviraj BP) यांनी दिली. कोविड प्रतिबंधासाठी जिल्हा प्राधिकरणाच्या वतीने लेव्हल- ३ चे निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्यानुसार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत पूर्वी दिलेल्या आदेशानुसार आस्थापना व बाजारपेठ सुरू राहणार आहे. या नियमावलीत प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाने पूर्वी दिलेले आदेश कायम राहणार आहेत, अशी माहिती पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली.(no relaxation in covid restriction in latur, district collector prithviraj bp information glp88)

हेही वाचा: पोलिसांच्या बदल्यांचा फुटला पोळा, मर्जीतल्यांची मात्र चांदी

गेल्या काही दिवसांपासून शहरात कोविडच्या संदर्भात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांबाबत शिथिलता दिली जाणार आहे. तसेच बाजारपेठ व आस्थापनाच्या वेळेतही वाढ केली जाणार आहे, अशी चर्चा रंगली होती. पण, आता जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी निर्बंधात शिथिलता दिलेली नाही, असे स्पष्ट केल्याने पूर्वीप्रमाणेच बाजारपेठ दुपारी चारपर्यंतच चालू ठेवावी लागणार आहे.

loading image
go to top