दहा हजार मतदारांची ‘नोटा’ला पसंती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

लातूर - महापालिकेच्या निवडणुकीत ‘वरीलपैकी एकही नाही’ म्हणजेच ‘नोटा’ला सुमारे नऊ हजार ७१४ मतदारांनी पसंती दिल्याने काही प्रभागात प्रमुख उमेदवारांची अडचण झाली. काही प्रभागात विजयी व पराभूत उमेदवारांच्या मतांतील फरकापेक्षाही ‘नोटा’ला जास्त मते पडल्याने त्याचा फटका प्रबळ उमेदवारांना बसला आहे. यातच अनेक प्रभागांत अपक्ष उमेदवारांनी चांगली मते घेतल्याने उमेदवारांचा घात झाल्याचे दिसत आहे.

महापालिका निवडणुकीत बुधवारी मतदान झाले. यात एक लाख ६० हजार ८५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी नऊ हजार ७१४ मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. नोटाला पडलेल्या मतांची संख्या एकूण मतदानाच्या आठ टक्के आहे. 

सर्वच अठरा प्रभागांतील ७० वॉर्डात मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे. किमान ४४ तर कमाल ४५० मते नोटाने घेतली आहेत. यात प्रभाग तीनमधील वॉर्ड ‘ब’मध्ये सर्वाधिक साडेचारशे मते ‘नोटा’ला पडली आहेत. या वॉर्डातील उमेदवार केवळ २६७ मतांनी विजयी झाला आहे. नऊ प्रभागात ४५ ते तीनशे मतांच्या फरकाने उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागत आहे. या प्रभागातही ‘नोटा’ला पडलेली मते फरकापेक्षा अधिक आहेत. खुल्या गटासह प्रबळ लढती असलेल्या प्रभागात अपक्ष उमेदवारांची मोठी गर्दी होती. या अपक्षांनी मते खाण्याचे काम केल्याने मतांचा फरक पडला. काही प्रभागात एमआयएम, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसनेही अपक्ष व नोटासोबत मते खाण्याचे काम केले. यामुळे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या विजयावर परिणाम झाल्याचे दिसत आहे.

Web Title: 'Nota' of ten thousand voters preferred