बीड जिल्ह्यात बीडीओ, सरपंच, ग्रामसेवकांना सीईओंच्या नोटिसा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 March 2020

सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी विविध सूचना दिल्या, परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नोटिसा बजावल्या आहेत.

बीड - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. सध्या गावपातळीवर पुणे - मुंबईहून आलेल्यांची संख्या वाढल्याने सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांनाही मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी विविध सूचना दिल्या होत्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आढळले आहे. यामुळे गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवकांना नोटिसा बजावल्या आहेत.

गेवराई तालुक्यातील बोरगाव व चकलंबा येथे आठवडे बाजार भरल्याने गटविकास अधिकारी के. एम. बागलू यांच्यासह बोरगावचे सरपंच सोमनाथ काळे, याच गावचे ग्रामसेवक श्री. चव्हाण, चकलांबाचे सरपंच सुरेश जाजू, ग्रामसेवक डी. एन. सरग यांना नोटीस बजावली आहे. तसेच, आठवडे बाजार भरविल्याने नेकनूरच्या सरपंच रोहिणी परमेश्वर काळे व ग्रामसेवक व्ही. बी. कैलवाड या दोघांनाही नोटीस बजावली आहे. 

हेही वाचा - कोरोना विषाणू येऊच नये म्हणून....

दोघांचे स्वॅब घेतले; १८ होम क्वारंटाइन 
शुक्रवारी अंबाजोगाईच्या स्वाराती महाविद्यालयात एकाचा व बीडच्या जिल्हा रुग्णालयात एकाचा अशा दोघांचे स्वॅब घेतले असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. तर, परदेशातून आलेल्या १८ जणांना होम क्वारंटाइन केलेले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice to BDO, Sarpanch, Gramsevak in beed district