शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

औरंगाबाद - ‘फ्लिपकार्ट’वरून शस्त्रखरेदी केल्याचा प्रकार औरंगाबाद शहरात उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी आता पोलिसांनी देशभरातील शस्त्रनिर्मिती करणाऱ्या आठ कारखान्यांना नोटीस पाठविली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.   

गुन्हे शाखेच्या पथकाने इन्स्टाकार्ट या ‘फ्लिपकार्ट’ची को-पार्टनर असलेल्या कुरिअर कंपनीवर २८ मे रोजी रात्री छापे टाकले होते. यात खेळण्याच्या नावाखाली फ्लिपकार्टद्वारे मागविण्यात आलेली शस्त्रे जप्त केली होती. यानंतर पोलिसांनी ‘फ्लिपकार्ट’ची चौकशी सुरू केली. गेल्या तीन महिन्यांत पंचवीसपेक्षा अधिक जणांनी शस्त्रे मागविल्याचे समोर आले. याप्रकरणी फ्लिपकार्टच्या अधिकाऱ्यांना नोटीस काढून हजर राहण्याचे सांगण्यात आले होते. अवैधपणे शस्त्रे विक्री केली जात असल्याने निर्मिती करणाऱ्या कारखान्यांनाही नोटीस पाठविली आहे; परंतु शस्त्रे तयार करणारे आठ कारखाने असून, ते देशभरात विविध ठिकाणी असल्याने तपासासाठी वेळ लागत आहे, असे प्रसाद यांनी सांगितले.

Web Title: Notice to the manufacturers of weapons making