‘बीईओं’ ना बजावल्या नोटीसा !

file photo
file photo
Updated on

परभणी : जिल्ह्यात अढळुन आलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती आणि त्यांना देण्यात येणाऱ्या विशेष प्रशिक्षण वर्गाची माहिती वेळेत न देणाऱ्या पाच गटशिक्षणधिकाऱ्यांना (बीईओं) कारणे दाखवा नोटीस बजावत प्रशासकीय कार्यवाहीचा इशारा शिक्षणाधिकारी डॉ. सुचीता पाटेकर यांनी दिला आहे.

२०१८-१९ मध्ये जिल्ह्यात ७२३ मुले शाळाबाह्य आल्याचे आढळुन आले आहेत. यामध्ये ३८३ मुले तर ३४०  मुलींचा समावेश आहे. वय वर्ष सहा ते सात वयोगटातील ३३१ बालकांचा समावेश आहे. तर, विशेष प्रशिक्षणांतर्गत बालकांची प्रस्तावीत संख्या ३९२ एवढी आहे. या सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शाळेत शिक्षण हक्क कायद्यानुसार वयानुरुप समकक्ष वर्गात प्रवेश देण्याच्या सुचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्यावतीने ता.१८ नोव्हेंबर २०१९ च्या पत्रात नमुद केले होते. त्यानुसार ता.१० डिसेंबर २०१९ पर्यंत विहीत नमुन्यात शाळाबाह्य बालकांची माहीती शिक्षण विभागाला सादर करण्याची सुचना सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना केली होती. तर, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याची सुचना ता.१४ ऑक्टोबर २०१९ रोजीच्या पत्रात केली होती. मात्र, आतापर्यंत केवळ मानवत, सेलु, परभणी, पाथरी  या तालुक्यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे उर्वरीत तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना मंगळवारी (ता.२१) शिक्षणाधिकारी डॉ.पाटेकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

 दोन दिवसात सादर करा
 सदरची माहिती जिल्हा शिक्षण विभागास वेळेत प्राप्त झालेली नाही. त्यामुळे राज्य कार्यालयास माहिती वेळेत पाठविता आली नाही. त्यामुळे सदरची माहिती वेळेत का सादर केली नाही याच्या खुलाशासह माहिती पत्र मिळताच दोन दिवसात सादर करावी, माहिती वेळेत प्राप्त न झाल्यास पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा या नोटीसीमध्ये देण्यात आला आहे. तर विशेष प्रशिक्षण वर्गाची माहिती वेळेत सादर न केल्याप्रकरणीदेखील पाच गटशिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ही माहितीदेखील केवळ मानवत, सेलु, परभणी, पाथरी  या तालुक्यांनी दिली आहे. त्यामुळे पूर्णा, पालम, गंगाखेड, जिंतूर, सोनपेठ येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस गेली आहे.

असा आहे  विशेष उपक्रम
शाळाबाह्य बालकांना त्यांची संपादणूक पातळी वाढण्यासाठी व निर्धारीत अध्ययन फलनिष्पती साध्य करण्यासाठी बालकांना विशेष प्रशिक्षण संबधीत वर्गाचे वर्गशिक्षक दिले जाते. शाळांमध्ये यापूर्वी भाषा, गणित, विज्ञान विषयाचे शैक्षणीक साहित्य
संच व अन्य शैक्षणीक पुरक साहित्य उपलब्ध करुन दिले. त्याच्या वापर अशामुलांच्या शिक्षणासाठी केला जातो. रोजगारानिमित्त स्थलांतर होणाऱ्या मजुरांच्या मुलांचे शैक्षणीक नुकसान होऊ नये म्हणून यासाठी प्रत्येक शाळेने कृती कार्यक्रम तयार करुन स्थलांतरीत मुलांबाबत पूर्वनियोजन करुन मुले स्थलांतरीत होत असताना मुलांसोबत शिक्षण हमी कार्य दिले जाते.



पाच तालुक्यांची माहिती नाही
नोव्हेंबर महिण्यात सर्व तालुक्यांकडून शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती मागवली होती. परंतू, अनेक ‘बीईओं’नी याबाबत अनास्था दाखवली आहे. तसेच ता.१० डिसेंबर २०१९ रोजी स्मरणपत्र दिले होते. तरीही पाच तालुक्यांची माहिती अद्यापर्यंत आली नसल्याने संबधीतांना नोटीसा बजावल्या आहेत.
-डॉ. सुचीता पाटेकर, शिक्षणाधिकारी (प्रा.)

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com