अबब...! १४ लाखाचे दागिणे जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली. त्याच्याकडून १४ लाखाचे दागिणे जप्त करून त्याची रवाणगी पोलिस कोठडीत केल्‍याचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी पत्रकांरांना दिली.

नांदेड : शहराच्या सराफा येथे रेल्वेतून चोरलेले हिरेजडीत सोने विक्री करण्यासाठी आलेल्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली. त्याच्याकडून १४ लाखाचे दागिणे जप्त करून त्याची रवाणगी पोलिस कोठडीत केल्‍याचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी पत्रकांरांना दिली.
 
चेन्नई एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्ब्यातून संजीव काबरा हे आपल्या परिवारास प्रवास करीत होते. त्यांच्या पत्नीच्या डोक्याखाली असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केल्याचा गुन्हा नांदेडच्या लोहमार्गच पोललिस ठाण्यात दाखल झाला होहता. या प्रकरणाचा तपास लोहमार्ग पोलिस सुध्दा करीत होते.  तसेच पोसलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शऩाखाली स्थानकि गुन्हे शाखेचे पथकही या चोरट्याच्या मागावार होते.

हेही वाचाBudget 2020 - अर्थसंकल्पाबाबत ‘काय’ म्हणतात नांदेडकर...वाचा...

रेल्वे प्रवाशी असुरक्षीत

शहराच्या वजिराबाद येथील संजीव काबरा हे आपल्या पत्नीसह हैदराबादहून चेन्नई एक्सप्रेसच्या वातानुकुलित डब्यातून जालना येथे जात होते. ता. २० जानेवारीच्या सकाळी रेल्वेच्या डब्यातून काबरा यांच्या पत्नीच्या डोक्याखाली असलेली पर्स हिसकावून चोरटा पसार झाला होता. त्या पर्समध्ये चौदा लाख रुपये किंमतीचे दागिने होते. याप्रकरणी काबरा यांनी पूर्णा रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिली. यावरून नांदेड लोहमार्ग पोलिस ठाणय्त गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार नांदेड पोलिसांनीही आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक दत्तराम राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. 

१४ लाखाचे हिरेजडीत दागिणे जप्त 

गुरूवारी (ता. ३०) जानेवारी रोजी चोरटा नांदेड येथील सराफा बाजारामध्ये दागिने विकण्यास आल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती. या माहितीवरून पथकाने छापा मारून आरोपीस अटक केली. आरोपी शेख इलियास शेख इसाक (वय २८) राहणार मस्तानपुरा, शाहूबाई गल्ली पूर्णा (जिल्हा परभणी) हल्ली मुक्काम मिल्लतनगर नांदेड यास ताब्यात घेतले. आरोपीची झाडाझडती केली असता तब्बल १४ लाख रुपये किमतीचा सोन्या- चांदीचा मुद्देमाल आढळून आला. आरोपी हा चोरलेले दागिणे विकुन मुंबईकडे जाणार होता अशी माहिती श्री. मगर यांनी दिली. 

येथे क्लिक करा - गणित- विज्ञान विषयाच्या भावी गुरुजींना प्रतिक्षा - कशाची ते वाचा

अट्टल चोरट्यास पोलिस कोठडी

आरोपीला अटक केल्यानंतर आता अधिक चौकशीसाठी रेल्वे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. लोहामार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहूल गायकवाड यांनी या चोरट्यास ताब्यात घेऊन औरंगाबाद लोहमार्ग न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत पाठविले आहे.  आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील नाईक, मांजरमक, पोलीस उपनिरीक्षक राठोड, कर्मचारी पिराजी गायकवाड, देविदास चव्हाण, रविकिरण बाबर, विलास कदम, झिंगलवाड, यादगिरवाड, दिनानाथ शिंदे यांनी कामगिरी बजावली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now ... 14 lakh jewelry seized, nanded police.