एटीएम आता ग्राहकांच्या दारी !   

प्रकाश बनकर
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

ग्रामीण भागातील ग्राहकांना एटीएमची सेवा मिळावी यासाठी पुर्वी बॅंक ऑफ महाराष्ट्राशी करार केला आहे. इतर खाजगी कंपन्याच्या एटीएमशीही आमचा टायप झाले आहेत. यासह आता दोन व्हॅनच्या माध्यमातून फिरते एटीएम देणार आहोत. ही व्हॅन सर्व जिल्ह्यात सेवा देणार आहे. चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर फिरते एटीएमची संख्या वाढवली जाईल. 
- एम.ए.काबरा, अध्यक्ष, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक.

औरंगाबाद : ग्रामीण भागातील नागरिकांना एटीएमची सुविधा मिळावी यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेतर्फे ग्राहकांच्या दारावर एटीएमची सुविधा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बॅंकेतर्फे 20 फेब्रुवारीपासून दोन फिरते एटीएमच्या माध्यमातून ही सेवा देणार आहे. हे फिरते एटीएम राज्यभरातील बॅंकेच्या शाखा असलेल्या 17 जिल्ह्यात जाणार आहे. अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष एम.ए.काबरा यांनी बुधवारी (ता.13) "सकाळ'ला दिली. 

राज्यातील 17 जिल्ह्यात 419 शाखांच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रामीण बॅंके ग्रामीण अर्थव्यवस्थेचा गाडा हाकत आहे.राष्ट्रीयकृत बॅंकाप्रमाणे ग्राहकांना सर्व सुविधा या बॅंकेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. सरकारतर्फे सर्वांना बॅंकेशी जोडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामूळे आता प्रत्येक घरातील व्यक्‍तीचे जनधन व बचत खात्यांच्या माध्यमातून बॅंकेत खाते उघडले जात आहे. असे असले तरी ग्रामीण भागात एटीएमची संख्या नागण्य आहेत. यामूळे पैसे काढयाचे असेल तर बॅंकेशिवाय दुसरा पर्याय नसतो. हि गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने हे फिरते एटीएम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 20 फेब्रुवारीला औरंगाबादच्या मुख्य शाखेपासून दोन्ही फिरत्या एटीएम व्हॅनचे लॉचिंग करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात पहिली फिरते एटीएम बीड-परभणी जिल्ह्यात पाठविले जाईल. तर दुसरे लातुर उस्मानाबाद जिल्ह्यासाठी पाठविले जाणार आहेत. बॅंकेच्या शाखा असलेल्या गावात हे फिरते एटीएम सेवा देणार आहे. मागणी प्रमाणे प्रत्येक गावात ही सेवा देण्याचा प्रयत्न बॅंकेतर्फे सुरु करण्यात आला आहेत. 

औरंगाबाद,जालना,बीड,उस्मानाबाद,हिंगोली, नांदेड,परभणी, लातुर, जळगाव, धुळे, नाशिक,नगर पुणे, नंदुरबार, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यात हे फिरते एटीएम जाणार आहे. 

ग्रामीण भागातील ग्राहकांना एटीएमची सेवा मिळावी यासाठी पुर्वी बॅंक ऑफ महाराष्ट्राशी करार केला आहे. इतर खाजगी कंपन्याच्या एटीएमशीही आमचा टायप झाले आहेत. यासह आता दोन व्हॅनच्या माध्यमातून फिरते एटीएम देणार आहोत. ही व्हॅन सर्व जिल्ह्यात सेवा देणार आहे. चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर फिरते एटीएमची संख्या वाढवली जाईल. 
- एम.ए.काबरा, अध्यक्ष, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक.

Web Title: now ATM on customers home