जनता दरबारमध्ये सहा मिनिटांत जन्म प्रमाणपत्र

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जुलै 2016

५५ पैकी १८ तक्रारींचे निवारण करण्यात महापौरांना यश

लातूर - शहरातील नागरिकांच्या तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी महापौरांनी बोलावलेल्या जनता दरबारात सोमवारी (ता. १८) तक्रारींचा पाऊस पडला. प्राप्त ५५ पैकी १८ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. यामध्ये मुलाचे जन्माचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी अर्ज दाखल केलेल्या दांपत्यास अवघ्या सहा मिनिटांत प्रमाणपत्र देण्यात आले.

महापौर ॲड. दीपक सूळ यांच्यासह निवडक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी जनता दरबार भरला. नागरिकांच्या महापालिकेशी संबंधित तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी महापौर सूळ यांनी पालिकेच्या मुख्य इमारतीत जनता दरबाराचे आयोजन केले होते. यात सोमवारी लेखी व तोंडी अशा एकूण ५५ तक्रारी प्राप्त झाल्या. 

यामध्ये विष्णू धनाजी खेडकर (रा. शिवणी) यांनी त्यांच्या मुलाचे जन्म प्रमाणपत्र मिळण्यासाठी पालिकेकडे सहा महिन्यांपूर्वी अर्ज सादर केला होता. परंतु त्यांना प्रमाणपत्र मिळाले नव्हते. महापौर ॲड. सूळ यांची तक्रार दाखल होताच महापौरांनी आदेश देऊन अवघ्या सहा मिनिटांत जन्म प्रमाणपत्र मिळवून दिले. अशा किरकोळ स्वरूपाच्या इतर तक्रारी जागीच सोडविण्यात आल्या. उर्वरित तक्रार अर्ज संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीस्तव आदेशासह सुपूर्द केल्याची माहिती महापौर सूळ यांनी दिली. विशेष म्हणजे रिपाइंचे नगरसेवक चंद्रकांत चिकटे यांनी झोपडवस्तीमधील नागरिकांचे कबाले मिळण्यासाठी जनता दरबारात हजेरी लावून तक्रार दाखल केली.

विभाग प्राप्त तक्रारी

बांधकाम १४ 

अतिक्रमण निर्मूलन २

विद्युत ४

कर निर्धारण ७

मालमत्ता आकारणी ४

स्वच्छता ४

विभाग प्राप्त तक्रारी

झोन कार्यालय २

पाणीपुरवठा १४

आस्थापना १

नगररचना १

रोडगॅंग १

जन्म-मृत्यू नोंदणी १

Web Title: Now, get the birth certificate within Six minutes

टॅग्स