esakal | लातूरहून पुणे, मुंबई, हैदराबादलाही आता बससेवा
sakal

बोलून बातमी शोधा

3s_20t_20bus_0

कोरोनामुळे मार्चपासून लांब पल्ल्याच्या बसेस बंद होत्या. पण आता अनलॉक प्रक्रिया सुरु झाली आहे. सर्व व्यवहार हळूहळू सुरु होत आहेत.

लातूरहून पुणे, मुंबई, हैदराबादलाही आता बससेवा

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : कोरोनामुळे मार्चपासून लांब पल्ल्याच्या बसेस बंद होत्या. पण आता अनलॉक प्रक्रिया सुरु झाली आहे. सर्व व्यवहार हळूहळू सुरु होत आहेत. हे लक्षात घेऊन लातूर विभागाने आता लांब पल्ल्याच्या बसेस सुरु केल्या आहेत. पुणे, मुंबई, हैदराबाद, कोल्हापूर अशा सर्वच ठिकाणी आता बसेस धावणार आहेत. त्यामुळे दसरा, दिवाळी या महत्त्वाच्या सणाच्या दिवसांत प्रवाशांची मात्र मोठी सोय होणार आहे.


गेल्या महिन्यापासून जिल्हाअंतर्गत बससेवा सुरु करण्यात आली होती. या मिळत असलेला प्रतिसाद पाहून ग्रामीण भागातही आता फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. दरम्यान लांब पल्ल्याच्या बसेस सुरु करण्याची मागणी होती. यातून आता शिवशाही, विनावातानुकुलित आसनी शयन तसेच साध्या लांब पल्ल्याच्या बसेस सुरु करण्यात आल्या आहेत.

लातूर प्रभाग समिती निवड प्रक्रिया पुन्हा न्यायालयात 

लातूरहून मुंबई सेंट्रल, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, हैदराबाद, पंढरपूर आदी बससेवा सुरु करण्यात आली आहे. उदगीरहून पुणे, औरंगाबाद, हैदराबाद, सोलापूर, अहमदपूरहून पुणे, निलंग्याहून पुणे, शिर्डी, औशाहून पुणे, औरंगाबाद, सातारा, अमरावती अशा बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. दसरा दिवाळी या सणाला मुंबई, पुणे, औरंगाबाद सारख्या ठिकाणाहून अनेक नागरीक आपल्या गावाकडे येतात. या बसेस सुरु झाल्याने त्यांची मोठी सोय होणार आहे.


जिल्ह्यातून सुमारे शंभर लांबपल्ल्याच्या बसेस आहेत. त्या आता सर्वच सुरु होत आहेत. पूर्ण क्षमतेने या बसेस धावणार आहेत. शिवशाही सारख्या बसेसही सुरु करण्यात आल्या आहेत. या बसेसचे दररोज निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
- सचिन क्षीरसागर, विभागीय नियंत्रक
 

संपादन - गणेश पिटेकर

loading image