ज्येष्ठ नागरिकांसाठी आता ‘ही’ योजना

file photo
file photo

नांदेड : वाढत्या वयोमानानुसार ज्येष्ठ नागरिकांनाही कर्णदोष, दृष्टीदोष, अस्थिव्यंगत्व, दातांच्या व्याधी आदींचा त्रास होतो, यासाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत जेष्ठ नागरिकांना मोफत व्हीलचेअर, श्रवणयंत्रे, चष्मे, दातांची कवळी आदी त्यांना आवश्यकतेनुसार सहाय्यक उपकरणे मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी लाभार्थ्यांना आधार कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा बी.पी.एल. कार्ड सादर करणे आवश्यक असल्याची माहितीही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी यावेळी दिली आहे.


जिल्हाधिकारी अरुण डोंगरे म्हणाले की अस्थिव्यंगांसाठी तीन चाकी सायकल, कुबडी, रोलेटर, व्हीलचेअर, सर्व प्रकारच्या काठ्या, सीपी चेअर देण्यात येणार आहे. तर मोटराइज ट्रायसायकलसाठी ८० टक्के दिव्यांगत्व असलेले प्रमाणपत्र व १२ हजार रुपये स्थानिक सहभाग गरजेचा आहे. अंध प्रवर्गासाठी ७५ टक्क्यावरील दिव्यांगत्व प्रमाणपत्र असणाऱ्याना स्मार्ट केन, ब्रेल कीट, डेसी प्लेअर, स्मार्ट फोन. मतिमंद प्रवर्गासाठी व्हीलचेअर, एम आर कीट, सी. पी. चेअर तर कर्णबधीर प्रवर्गासाठी श्रवणयंत्राचे वितरण करण्यात येणार असून ता. १० ते २६ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दिव्यांग लाभार्थ्यासाठी मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तालुका स्तरावर मोजमाप शिबीर

जिल्ह्यातील तालुका स्तरावर नांदेड येथे ता. १० डिसेंबर, अर्धापूर ता.११, मुदखेड ता. १२, भोकर ता. १३, हदगाव ता. १४, किनवट ता. १५ व ता. १६, माहूर ता. १७, हिमायतनगर ता. १८, लोहा ता. १९, कंधार ता. २०, नायगाव ता. २१, मुखेड ता. २२, देगलूर ता. २३, बिलोली ता. २४ धर्माबाद ता. २५ तर उमरी येथे ता. २६ डिसेंबर रोजी मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्वनोंदणी साठी त्या त्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात दिव्यांगांनी अपंगत्व प्रमाणपत्र, चालू वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्डच्या झेरॉक्स व दोन फोटोसह संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे. 

‘वयोश्री योजने’ चा लाभ घ्यावा असे आवाहन

तसेच कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनामुळे आता दिव्यांगांना कोणाच्याही मदतीची गरज असणार नाही. भविष्यात स्वावलंबी जीवन जगण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच पात्र दिव्यांगांनी एडीआयपी तसेच ज्येष्ठ नागरिकांना ‘वयोश्री योजने’ चा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हापरिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आउलवार यांनी केले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com