राज्यात 'विकी डोनर' चा ट्रेंड वाढला ! (व्हिडीओ)

महंम्मद इरफान
बुधवार, 10 एप्रिल 2019

बऱ्याच अंशी बदलत्या जीवनशैलीमुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढत चालले आहे. म्हणून स्पर्म बँकेची मागणी वाढली आहे.

औरंगाबाद : माहिती तंत्रज्ञानामुळे आता मातृत्त्वही सोपे झाले आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात स्पर्म डोनर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विषेशतः महाराष्ट्रात 'विकी डोनर'चा ट्रेंड वाढला आहे. 

डॉक्टर, इंजिनिअर, वकील तरुणांच्या स्पर्मचा आग्रह वाढला आहे. मुंबईसह नाशिक, औरंगाबादमधून स्पर्मच्या मागणीत वाढ झाली आहे. प्रत्येक जोडप्याचे आपल्या बाळाबद्दल काही स्वप्नं असतात. ते सुंदर आणि हुशार असावे असे प्रत्येकच जोडप्याला वाटते. पण अलिकडच्या काळात वंध्यत्वाचे प्रमाण वाढत चालले आहे. आता याला कारणे अनेक आहेत. बदलती जीवनशैली, खाणपानात झालेले बदल, कामांच्या पध्दतींची बदललेली रचना यांमुळे तरुण वर्गात शारिरीक आणि मानसिक बदलांना गती आली आहे. 

यातूनच वंध्यत्वाचे प्रमाण वाढत चालले आहे. म्हणून स्पर्म बँकेची मागणी वाढली आहे. जर मुल होत नसेल तर दत्तक घेण्याऐवजी आपल्याच पोटी बाळ जन्माला यावे यासाठी ही मातृत्त्वाची ओढ वाढल्याने स्पर्म बँकेची मागणी वाढली आहे. यातूनच राज्यभरात 'विकी डोनर'ची संख्याही वाढली आहे. 

स्पर्म डोनेट करायलाही काही नियम आहेत.

  •  'स्पर्म डोनर'ची संपूर्ण पार्श्वभूमी जाणून घेतली जाते. 
  •  डोनरचे सिमन सॅम्पल, ब्लड सॅम्पल तपासले जाते.
  •  डोनरचे कलर कॉम्पलेक्शन, शिक्षणार्हता, कौटूंबिक पार्श्वभूमी, रक्तगट, एचआयव्ही, एचबीएसएजी, सिकलसेल बनेमिया, बी थायलोसोमिया, व्हीडीआरएल ची तपासणी केली जाते.
  •  मागणीनुसार स्पर्म दिले जातात. 
  •  सर्व माहिती गोपनीय ठेवली जाते. 
  •  स्पर्म देणारी व्यक्ती आठवड्यातून तीन दिवसानंतर स्पर्म डोनेट करु शकते.
  •  डोनरला 300 ते 5000 पर्यंतची रक्कम दिली जाते.
Web Title: The number of sperm donors has increased in Maharashtra