शहरात नायलॉन, प्लास्टिक, चिनी मांजाची सर्रास विक्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

औरंगाबाद - उच्च न्यायालयाच्या आदेशावरून प्रशासनाने नायलॉन, प्लास्टिक आणि चिनी मांजावर बंदी घातलेली असतानाही शहरात त्याची अवैधरित्या सर्रास विक्री केली जात आहे. प्रशासन मात्र यावर गंभीर दखल घेताना दिसत नाही. 

औरंगाबाद - उच्च न्यायालयाच्या आदेशावरून प्रशासनाने नायलॉन, प्लास्टिक आणि चिनी मांजावर बंदी घातलेली असतानाही शहरात त्याची अवैधरित्या सर्रास विक्री केली जात आहे. प्रशासन मात्र यावर गंभीर दखल घेताना दिसत नाही. 

संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग काटाकाटीसाठी प्रत्येकजण मजबूत मांजा विकत घेतात. परंतू हेच नायलॉन, प्लास्टिक आणि चिनी मांजे प्राणी-पक्षी तसेच माणसांसाठी प्राणघातक सिद्ध होताना दिसत आहेत. कित्येक वेळा मांजासह कटलेला पतंग एखाद्या झाडात, विद्युत तारेवर किंवा जमिनीवर पडतो. त्या मांजामध्ये प्लास्टिक, काच, शिसं, पर्यावरणास हानीकारक, असे धातू असतात. असा पडलेला मांजा पक्ष्यांच्या पायात किंवा पंखात अडकतो. त्यामुळे पक्ष्यांना इजा होते किंवा मृत्युमुखी पडतात. मुक्‍या जनावरांच्या पोटात चाऱ्यासोबत मांजा गेल्यास जनावरांचा मृत्यू होतो. 
दरवर्षी नायलॉन मांजामुळे अनेक मुले गंभीर स्वरूपात जखमी होतात. झाडाला किंवा खांबाला अडकलेल्या मांजा डोळ्यावर, तोंडावर, गळ्याला, शरीरावर कुठेही अडकतो. त्यामुळे कित्येक दुचाकीस्वार जखमी होतात, मृत्युमुखीही पडतात. पक्षी-प्राणीप्रेमी संस्थांनी नायलॉन मांजावर बंदी घालून अशा अवैध विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु अवैध मांजा विक्रेत्यांवर याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. शहराच्या गल्लीबोळात अशा नायलॉन, प्लास्टिक किंवा चिनी मांजाची सर्रास विक्री होताना दिसत आहे.

Web Title: nylon, plastic chini manja sailing