Obc Protest : ओबीसींचे आरक्षण वाचवा ; सकल ओबीसी समाजाची माजलगावात निदर्शने

ओबीसी, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गाचे आरक्षण वाचवा, या मागणीसह विविध मागण्यांसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने गुरुवारी (ता. १) आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश सोळंके, तहसीलदार वर्षा मनाळे यांना आंदोलकांनी निवेदन दिले.
beed
beedsakal

माजलगाव : ओबीसी, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गाचे आरक्षण वाचवा, या मागणीसह विविध मागण्यांसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने गुरुवारी (ता. १) आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश सोळंके, तहसीलदार वर्षा मनाळे यांना आंदोलकांनी निवेदन दिले.

राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरे या शब्दाची व्याख्या बदलून समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासन अध्यादेश काढला आहे. त्यामुळे ओबीसी समाजात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, हा निर्णय मुळ ओबीसींवर अन्याय करणारा आहे.

beed
OBC Vs Maratha: सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या निर्णयाविरोधात ओबीसींची याचिका, उच्च न्यायालयाने काय म्हटलं?

त्याचबरोबर शिंदे समिती ही घटनात्मक नसतांना शिंदे समितीच्या शिफारशीवरून कुणबी प्रमाणपत्र देणे घटनाबाह्य आहे का, असा सवाल करत ओबीसी, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गाचे आरक्षण वाचवा व त्यांच्या विवीध हरकतीचे निवेदन आमदार प्रकाश सोळंके यांना देत त्यांच्या निवासस्थानावर निदर्शने तर तहसीलदार वर्षा मनाळे यांना निवेदन देत तहसिल कार्यालयावर सकल ओबीसी समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com