आयुक्तांनी पाहिला चिखलात हरविलेला रस्ता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

पावसामुळे अनेक वॉर्डातील रस्ते चिखलामध्ये हरवले असून, नागरिकांना पायी चालणे देखील अवघड झाले आहे. सोमवारी (ता. पाच) सायंकाळी मिसारवाडी भागात आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढत वॉर्डात पाहणी करावी लागले. वॉर्डातील समस्या सोडविण्याचा आश्‍वासन यावेळी आयुक्तांनी दिले.

औरंगाबाद - पावसामुळे अनेक वॉर्डातील रस्ते चिखलामध्ये हरवले असून, नागरिकांना पायी चालणे देखील अवघड झाले आहे. सोमवारी (ता. पाच) सायंकाळी मिसारवाडी भागात आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढत वॉर्डात पाहणी करावी लागले. वॉर्डातील समस्या सोडविण्याचा आश्‍वासन यावेळी आयुक्तांनी दिले.

 मिसारवाडी वॉर्डात अनेक नागरी समस्या आहेत. बहुतांश भाग गुंठेवारी असल्यामुळे नगरसेविका संगीता वाघुले वारंवार सर्वसाधारण सभेत प्रश्‍न उपस्थित करत आहेत. आयुक्तांनी वॉर्डात भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

त्यानुसार आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सोमवारी भेट देऊन विविध समस्या नगरसेविका संगीता वाघुले यांच्याकडून जाणून घेतल्या. त्यांनी आंबेडकरनगर ते पिसादेवी रोड, मिसारवाडी भागातील अंतर्गत रोड, शाळेसाठी असलेल्या रस्त्यावर पुलाची पाहणी केली. हे प्रश्‍न मार्गी लावण्याच्या सूचना उपअभियंता सुनील जाधव यांना केल्या. यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे, वॉर्ड अधिकारी कमलाकर ज्ञाते, रविकिरण कुलकर्णी, राजू त्रिभुवन, दिनेश बियाणे, दिलीप राठोड, सुभाष वाघुले यांच्यासह वॉर्डातील अली चाऊस, मतीन शहा, जमील शेख, मुजीब शेख, श्री. चव्हाण, विकी वाघुले यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Observation of muddy roads