"मातोश्री'हून आदेश मिळताच "रायगड' होणार सज्ज 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद  -  "मातोश्री'वरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदेश आल्यानंतर राजीनामा देण्याची तयारी महापौर त्र्यंबक तुपे यांनी त्यांच्या "रायगड' या निवासस्थानी शुक्रवारी (ता. 18) पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना दर्शविली. करारानुसार एक वर्ष भाजपला महापौरपद दिले जाणार आहे. मात्र, राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या चालढकलीमुळे मात्र भाजपच्या वाट्याचा एक महिना जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

महापौर तुपे यांच्या वतीने "रायगड' या त्यांच्या निवासस्थानी दिवाळी स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रतिष्ठित नागरिक, उद्योजक, अधिकारीवर्ग यांना आमंत्रित करण्यात आले होते. या
प्रसंगी माध्यमांशी अनौपचारिक गप्पा मारताना महापौरांनी राजीनामा देण्यासंदर्भात अद्याप पक्षाकडून आदेश आले नसल्याचे सांगितले. पक्षाकडून आदेश प्राप्त होताच सात दिवसांत विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करून मी महापौरपदाचा राजीनामा देईन. मात्र, आदेशच नसल्यामुळे राजीनामा देणार कसा? असा प्रश्‍न महापौरांनी केला. करारानुसार सुरवातीचे दीड वर्ष शिवसेनेला, दुसरे एक वर्ष भाजपला, तर शेवटचे अडीच वर्ष पुन्हा शिवसेनेला देण्याचा करार झाला आहे. यानुसार गेल्या 31 ऑक्‍टोबरला महापौर तुपे यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. यापूर्वी 5 नोव्हेंबरपर्यंत शिवसेनेचे महापौर राजीनामा सादर करतील, असे सांगितले जात होते.

मात्र, यानंतरही दहा दिवस उलटूनही अद्याप "मातोश्री'वरून महापौरांना राजीनामा देण्यासंदर्भात आदेश प्राप्त झाले नसल्याने शिवसेनेच्या भूमिकेबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांत शंका व्यक्‍त केली जात आहे. तथापि, भाजपच्या स्थानिक वरिष्ठ नेत्यांकडून अद्याप याविषयी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी भाजपच्या उमहापौरांनी राजीनामा देण्याची शक्कल काही नगरसेवकांनी शोधून काढली होती. मात्र, शिवसेनेत जोपर्यंत राजीनामा देण्याविषयी भूमिका स्पष्ट केली जात नाही, तोपर्यंत उमहापौरपदाचाही निर्णय प्रलंबित ठेवण्याचे धोरण भाजपच्या वरिष्ठांनी स्वीकारले आहे. 

Web Title: Offered to resign after order mayor