चोरीच्या आरोपानंतर  वृद्ध महिलेची आत्महत्या 

चोरीच्या आरोपानंतर  वृद्ध महिलेची आत्महत्या 

परळी वैजनाथ (जि. बीड) - परळी शहरातील स्नेहनगरात राहणाऱ्या एका घरकाम करणाऱ्या वृद्ध महिलेने आपल्यावर चोरीचा आरोप झाल्याने आत्महत्या केली. 
एक वृद्ध महिला बॅंक कॉलनीत मंजू गणेश पुजारी यांच्या घरी काही दिवसांपासून धुणी-भांडी करीत होत्या. हात मोडला म्हणून आठ दिवस त्या श्रीमती पुजारी यांच्याकडे घरकामास गेल्या नाहीत.

दरम्यान, श्रीमती पुजारी यांनी आपल्या घरी चोरी झाल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दिली. तक्रार अर्जात घरकाम करणाऱ्या वृद्ध महिलेचे नाव घेण्यात आले. ही माहिती कळताच वृद्ध महिलेने विष प्राषन केले.

उलट्या होत असल्याने वृद्धेस तिच्या मुलाने गुरुवारी (ता. सात) येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, येथील शहर पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर रुग्णवाहिकेत महिलेचा मृतदेह शनिवारी (ता. नऊ) दिवसभर ठेवण्यात आला. जोपर्यंत पुजारी यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार नाही, तोपर्यंत मृतदेह हलवला जाणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com