बनावट नोटा छापाई प्रकरणी बीड जिल्ह्यातून एकास एलसीबी पथकाने घेतले ताब्यात

प्रकाश काळे
Wednesday, 9 December 2020

बनावट नोटा छापाई प्रकरणी औरंगाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने बुधवारी (ता.नऊ) एकास सकाळी झेरॉक्स केंद्रावर छापा टाकुन साहित्यासह एकास ताब्यात घेतले.

किल्लेधारुर (जि.बीड) : बनावट नोटा छापाई प्रकरणी औरंगाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने बुधवारी (ता.नऊ) एकास सकाळी झेरॉक्स केंद्रावर छापा टाकुन साहित्यासह एकास ताब्यात घेतले. औरंगाबाद एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक बी.आर.आहीर यांच्या पथकाने  हनुमान गल्लीतील एका झेरॉक्स केंद्रावर छापा टाकुन आकाश माने यास प्रिंटर, स्कँनर, बनावट नोटा व साहित्यासह औरंगाबाद येथील पोलिस ठाण्यात बनावट नोटासंबधी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये आरोपीस ताब्यात घेतले व औरंगाबादला रवाना झाले.

तालुक्यातील आरणवाडी येथील राहणाऱ्या आकाशाने शहरात दोन वर्षांपूर्वी झेराँक्स व आॅनलाईन पीकविमा व अन्य सेवा देण्याचा व्यवसाय सुरु केला होता. बनावट नोटाच्या रँकेटमध्ये शहरातील अन्य काही तरुणही अडकल्याची चर्चा आहे. सोबतच बनावट नोटा प्रकरणी झालेल्या कार्यवाहीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Arrested In Case Of Fake Currency Printing Killedharur Beed News