धक्कादायक: मुंबईहून गावी पळून आलेल्या जवानास कोरोना, गावही रेडझोनमध्ये

युवराज धोतरे
शनिवार, 23 मे 2020

मुंबईहून पळून आलेल्या अग्निशामक दलाच्या जवानास कोरोपाची लागन झाली आहे. शुक्रवारी (ता.२२) दोन प्रलंबित असलेले अहवाल मध्यरात्री उशीरा जाहीर करण्यात आले असून शहरातील हनुमान कट्टा व हंगरगा (ता.उदगीर) येथे मुंबईहून पळुन आलेल्या जवानासह दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

उदगीर: मुंबईहून पळून आलेल्या अग्निशामक दलाच्या जवानास कोरोपाची लागन झाली आहे. शुक्रवारी (ता.२२) दोन प्रलंबित असलेले अहवाल मध्यरात्री उशीरा जाहीर करण्यात आले असून शहरातील हनुमान कट्टा व हंगरगा (ता.उदगीर) येथे मुंबईहून पळुन आलेल्या जवानासह दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. हनुमान कट्टा अगोदरच रेडझोन मध्ये असून आता नवीन हंगरगा गावही रेडझोन मध्ये आले आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

शहरातील कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता उदगीर शहरातील कोरोना रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या उदगीर एकोणीस व जळकोट दोन अशी एकूण एकवीस झाली आहे. या सर्वांची प्रकृती सध्या ठणठणीत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सतीश हरिदास यांनी सांगितले आहे.
मुंबईच्या महानगरपालिकेत अग्निशामक दलात काम करणारा एक तरुण कुठलीही परवानगी नसताना तेथून हंगरगा येथे पळून आला आहे. याची माहिती आरोग्य विभागाला मिळताच त्यांनी त्याची तपासणी केली त्याचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवला असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील हनुमान कट्ट्याजवळ कटलरी व बांगड्याविक्री करणाऱ्या एका ५५ वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण झाली आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या रुग्णास नेमका कोठून संसर्ग झाला याची माहिती आरोग्य विभाग घेत आहे. हनुमान कट्ट्याचा काही भाग शासनाकडून यापूर्वी रुग्ण आढळल्याने सील करण्यात आला होता. आता वाढीव भागही सील करण्यात येणार आहे. हंगरगा गावातील या पॉझिटिव्ह आलेल्या तरुणाच्या घराचा परिसरही सील करण्यात येणार असून या भागातील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.

नागरिकांनो काळजी घ्या...
कोरोणा संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र राज्य शासनाने टाळेबंदीत सर्व दुकानांना टप्प्याटप्प्याने उघडण्याची परवानगी दिल्याने जास्तीत जास्त संपर्क येण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र या परिस्थितीत कमीत कमी संपर्क कसा येईल व शारीरिक अंतर ठेवून सॅनिटायझर, मास्कचा वापर करून काळजी घेतल्यास संसर्ग होणार नाही. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two CoronaVirus Positive Patient Found In Udgir Taluka Latur News