मुगटजवळ युवकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

मृत युवकाच्या डोक्यावर मागील बाजूस जोरात प्रहार करण्यात आला होता. डोक्यावर झालेला प्रहार इतका जोरदार होता की त्यामध्ये जागीच युवकाचा मृत्यू झाला.

नांदेड - नांदेडमधील मुदखेड रस्त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात मध्यरात्री एक धक्कादायक प्रकार घडला. एका 26 वर्षीय युवकाच्या डोक्यावर जबर प्रहार करून खून करण्यात आला असून पहाटे हा प्रकार उघडकीस आला.

मुदखेड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मुगट-मातासाहेबजी रस्त्यावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात एक मृत युवक पडलेला होता. पोलिसांना सदर प्रकाराची माहिती मिळताच त्वरित घटमास्थळी पोहचून त्या ठिकाणची पाहाणी केली. त्या ठिकाणी नानकसिंह बाबूसिंह पुजारी (26) हा युवक मृत अवस्थेत आढळून आला. मृत युवकाच्या डोक्यावर मागील बाजूस जोरात प्रहार करण्यात आला होता. डोक्यावर झालेला प्रहार इतका जोरदार होता की त्यामध्ये जागीच युवकाचा मृत्यू झाला. तसेच घटनास्थळी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदन करण्यासाठी रूग्णालयात पाठविले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: One Boys Murder Near Mutgal In Nanded