CoronaUpdate: निलंगा तालूक्यात पाचवा बळी

राम काळगे
रविवार, 12 जुलै 2020

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातही कोरोना संसर्ग वाढत असून औराद शहाजानी येथील कोरोनाचा पाचवा बळी ठरला आहे. यापूर्वी मदनसुरी, गौर व औंढा येथील नागरीकांचा समावेश आहे. सध्या क्वारंटाईन म्हणून विलगीकरण कक्षात ७० जणांना ठेवण्यात आले आहे तर अॕक्टीव्ह केस ४० आहेत. 

निलंगा (जि. लातूर): तालुक्यातही कोरोना संसर्ग वाढत असून औराद शहाजानी येथील कोरोनाचा पाचवा बळी ठरला आहे. यापूर्वी मदनसुरी, गौर व औंढा येथील नागरीकांचा समावेश आहे. सध्या क्वारंटाईन म्हणून विलगीकरण कक्षात ७० जणांना ठेवण्यात आले आहे तर अॕक्टीव्ह केस ४० आहेत. 

हेही वाचा- उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांना औरंगाबाद खंडपीठाची अवमान नोटीस, पण कशामुळे?  

तालुक्यात कोरोना संसर्ग दिवसेदिवस वाढत असून निलंगा शहरासह तालुक्यात अचानक अधिक फैलाव कोरोनाचा होईल असे वाटत नव्हते मात्र निलंगा शहरात व तालुक्यातील कांही मोजक्या गावात कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. संसर्ग वाढू नये म्हणून शहरातील व्यापाऱ्यानी बैठक घेऊन पाच दिवस शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

यापुढेही दुकाने बंद राहणार की चालू होणार हे अद्याप अस्पष्ट आहे. प्रारंभी तालुक्यातील मदनसुरी येथे दोघांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला असून त्यानंतर औंढा, गौर व औरादशहाजानी असे एकुण पाचजण मृत्यू पावले आहेत. तर ४० अॕक्टीव्ह जणावरती उपचार सुरू आहे. तर ७०  जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

हेही वाचा- कोरोनाचे सर्वच रेकॉर्ड जपून ठेवा, खंडपीठ करणार पाहणी  

कोरोना संसर्ग असलेल्या ठिकाणी कंटेंन्टमेंट झोन तयार करण्यात आला आहे. त्या ठिकाणी वरिष्ठ आधिकारी यांनी पाहणी केली असून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पाहणी करून या झोनबाबत कडक सूचना दिल्या आहेत. शिवाय ग्रामीण भागातही ५० वर्षावरील व्यक्तीची तपासणी मोहीम आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. शिवाय प्रशासकीय पातळीवरही कोरोना संसर्गाचा फैलाव होणार नाही यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

असा आहे कोरोना मीटर

संस्थात्मक विलगीकरण -७०
अॕक्टीव्ह केस - ४०
मृत्यू - पाच

हेही वाचा- आमदार कुचे यांच्यासह भाऊ, युवतीविरोधात गुन्हा दाखल, युवतीकरवी भाच्यालाच पाठविले अश्लिल संदेश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One CoronaVirus Positive Patient Death Latur News