esakal | मुंबईत वडिलांसोबत २ महिने दवाखान्यात राहिला, गावी आल्यानंतर झोपच उडाली....
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaVirus News

लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी वडीलांच्या उपचारासाठी वडवळ नागनाथ येथील एक युवक मुंबईत दोन महिने राहिला. चार दिवसापूर्वी येथे वडीलांना घेऊन परत आला. या घडामोडीत रविवारी (ता.१७) रात्री युवकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आणि वडवळकरांची झोपच उडाली. रविवारी रात्रीपासूनच ग्रामस्थांवी भीतीपोटी जनता कर्फ्यू सुरू ठेवला आहे.

मुंबईत वडिलांसोबत २ महिने दवाखान्यात राहिला, गावी आल्यानंतर झोपच उडाली....

sakal_logo
By
संतोष आचवले

वडवळ नागनाथ (जि. लातूर) : लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी वडीलांच्या उपचारासाठी वडवळ नागनाथ येथील एक युवक मुंबईत दोन महिने राहिला. चार दिवसापूर्वी येथे वडीलांना घेऊन परत आला. या घडामोडीत रविवारी (ता.१७) रात्री युवकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आणि वडवळकरांची झोपच उडाली. रविवारी रात्रीपासूनच ग्रामस्थांवी भीतीपोटी जनता कर्फ्यू सुरू ठेवला आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

वडीलांच्या आजारावर उपचार करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपूर्वी येथील एक युवक वडीलांना घेऊन मुंबईला गेला होता. तेथे त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर ते पुढील उपचार लातूरला घेण्यासाठी मुंबईहून रुग्णवाहिकेने परत आले. येथे येण्यापूर्वी ते बुधवारी (ता.१३) ते पहिल्यांदा चाकूरच्या ग्रामीण रूग्णालयात गेले.

दोघांची तपासणी करून डॉक्टरांनी त्यांच्या हातावर होम क्वारंनटाईनचा शिक्का मारला. त्यानंतर पितापुत्रांनी रात्री घरातच विलगीकरण करून वेगळ्या खोलीत मुक्काम केला. गुरूवारी (ता.१४) युवकाच्या पोटात दुखू लागल्याने त्याला लातूरला एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

यावेळी तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचारासाठी पाठवले. उपचारा दरम्यान रविवारी रात्री तरूणाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला. गावापासून दूर असलेला कोरोना गावातच आल्याने आता निष्काळजीत राहून चालणार नसल्याने गावकरीही अलर्ट झाले आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

loading image