धक्कादायक : बीडमध्ये स्वॅब घेतलेल्या एकाचा तासाभरात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करून स्वॅब घेतलेल्या एकाचा रात्री उशिरा मृत्यू झाला. आष्टी तालुक्यातील एका वृद्धाच्या स्वॅब अहवालाकडे लक्ष आहे. रात्री कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतल्यानंतर तासाभरात त्याचा मृत्यू झाला. आता त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

बीड : जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करून स्वॅब घेतलेल्या एकाचा रात्री उशिरा मृत्यू झाला. आष्टी तालुक्यातील एका वृद्धाच्या स्वॅब अहवालाकडे लक्ष आहे. रात्री कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतल्यानंतर तासाभरात त्याचा मृत्यू झाला. आता त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३६ कोरोनाग्रस्त आढळले असून एका वृद्ध महिलेचा मृत्यू तर सहा जण उपचारासाठी पुण्याला गेले आहेत. २९ कोरोनाग्रस्तांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरील रुग्ण हा मागच्या काही दिवसांपासून आजारी होता.

यापुर्वी त्याने विविध ठिकाणी उपचार घेतले. मात्र, श्र्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यास बीड येथे आणण्यात आले. त्याला येथे विलगिकरन कक्षात दाखल करुन घेण्यात आले. रात्री त्याचा कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतला. यानंतर तासाभराने सदरील रुग्णाचा मृत्यू झाला. आता अहवालाकडे लक्ष लागले असून त्यानंतर खरे कारण समजू शकेल.
महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

औरंगाबादेत@१२१२ पॉझिटिव्ह

औरंगाबाद ः औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरूच असताना शुक्रवारी (ता.२२) रोजच्या दिलासादायक म्हणजे सरासरीपेक्षा आज बाधितांची संख्या थोडी कमी आली आहे. आज २६ रुग्ण बाधित झाले असून एकूण रुग्णसंख्या १ हजार २१२ झाली आहे. अशी माहिती घाटी रुग्णालयाने दिली आहे.

आकडे बोलतात...
एकूण रुग्ण - १२१२
मृत्यू -४२
उपचार - ६५८
बरे झालेले - ५१२

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Death After Hour of Swab Tasting Beed News