Accident : कार दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, एक जण जखमी

कार व स्कुटीचा अपघात होऊन एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सुमारास घडली.
Accident
Accidentsakal

उदगीर (जि. लातुर) - तालुक्यातील तोंडार पाटी नांदेड बिदर रोडवर कार व स्कुटीचा अपघात होऊन एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.१९) रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे.

याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आलेली अधिक माहिती अशी की उदगीर कडून वाढवण्याकडे जाणारी ईरटीका कार क्रमांक एम. एच. २४ बी. आर. ९१६१ ही उदगीर कडून नांदेडकडे जात असताना व उदगीरकडे येत असलेल्या स्कुटी क्रमांक टी. एस. ११ ई. एक्स. १५८० स्कुटी या वाहनांचा तोंडार पाटीजवळ अपघात झाला.

या अपघातात स्कुटीस्वार जागीच ठार झाला आहे. तर एक व्यक्ती जखमी झाला असून उदगीर येथील शासकीय सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात शेख मुजाहीद सरदारसाब (वय-४२) रा. मुसा नगर उदगीर यांचा जागीच मृत्यू झाला.तर फिरदोस शरफोद्दीन शेख (वय-२९) वर्ष राहणार पीर मुसा नगर उदगीर हे किरकोळ जखमी झाले. याबाबत येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com