बंद ऑइल मिलमधील स्फोटात एक ठार

तळेगाव (ता. परळी) - येथील तेल मिलमध्ये रविवारी स्फोटात उडून पडलेले पत्रे.
तळेगाव (ता. परळी) - येथील तेल मिलमध्ये रविवारी स्फोटात उडून पडलेले पत्रे.
परळी वैजनाथ - बंद ऑइल मिलमध्ये अचानक स्फोट होऊन एक कामगार ठार, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. स्फोटाचे कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही. गोपाळ लक्ष्मण गणगे (वय 50, रा. अकोला) असे ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे. परळी-बीड राज्य रस्त्यावरील तळेगाव येथे गजानन एक्‍स्ट्रशन लिमिटेड नावाची ऑइल मिल आहे. अनेक दिवसांपासून बंद असलेल्या मिलमध्ये रविवारी सकाळी स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की, जवळपास तीन किलोमीटर अंतरापर्यंत आवाज ऐकायला मिळाल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे घबराट पसरली. स्फोटात गोपाळ गणगे (वय 50) हे जागीच ठार झाले, तर ज्ञानोबा अमृतराव लुंगेकर (वय 40) व गोपाळ वासुदेव घाटूळ (वय 38) हे दोघे गंभीर जखमी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com