
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर चौसाळा बायपास जवळील चौकात रविवारी (ता. सहा) सायंकाळी सातच्या दरम्यान कंटेनर-दुचाकीची समोरा-समोर धडक झाली.
चौसाळा (जि. बीड) : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर चौसाळा बायपास जवळील चौकात रविवारी (ता. सहा) सायंकाळी सातच्या दरम्यान कंटेनर-दुचाकीची समोरा-समोर धडक झाली. यात नामदेव मस्के (वय ४०, रा. गोलंग्री ता. बीड) यांचा जागीच मृत्यू झाला तर वाल्मीक खवले (वय ३०, रा. कानडी घाट ता. बीड) गंभीर जखमी झाले.
प्राप्त माहितीनुसार, चौसाळा बायपासजवळ एक कंटेनर (एचआर ५६ बी २३४४) लापूरकडून बीडकडे जात होता. दरम्यान, मस्के आणि खवले हे दुचाकीवरून (एमएच २० सी के ९३८२) हे नेकनूर येथील आठवडे बाजाराहून गावाकडे जात होते. त्यांच्या दुचाकीची कंटेनरशी धडक झाली. यात ऊसतोड मुकादम असलेले मस्के यांचा जागीच मृत्यू झाला तर ऊसतोड कामगार असलेले खवले गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच भीमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमन नितीन लोढा यांनी तत्काळ खवले यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.