चालकाचा ताबा सुटला; अकोल्याला जाणारी बस लातूर-उमरगा महामार्गावर पलटल्याने एकाचा मृत्यू, १३ प्रवाशी जखमी

विश्वनाथ गुंजोटे
Sunday, 10 January 2021

बस चालकाचा ताबा सुटल्याने एसटी बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला.

किल्लारी (जि.लातूर) : लातूर-उमरगा राष्ट्रीय महामार्गावरील वाघोली पाटी (ता.औसा) येथे एसटी बस व ट्रकचा अपघातात एकाचा मृत, तर १३ प्रवाशी जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.दहा ) सकाळी घडली. यात एसटीचे ही मोठे नुकसान झाले आहे. निलंगा आगाराची बस (एमएच २० बीएल ३९७३) १४ प्रवासी घेऊन घेऊन निलंगा ते अकोला प्रवासासाठी निघाली होती. वाघोली पाटील जवळ ट्रक व बस समोरासमोर बाजुला घासली.

अशोक चव्हाण मराठा आरक्षणाबाबत अपयशी ठरले, विनायक मेटेंचा घणाघाती आरोप

यामुळे बस चालकाचा ताबा सुटल्याने एसटी बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला. जखमी प्रवाशांना लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी महसूल, पोलीस तसेच एसटीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी एसटी महामंडळाचे अजय गायकवाड, ए. डब्ल्यू. एस. होळकर ,  डी.वाय. एम. ई. जाधव, वाहतूक नियंत्रक एस.एस. परिहार हे घटनास्थळी उपस्थित होते. पुढील कार्यवाहीसाठी औसा पोलिसांची कार्यवाही सुरु केली आहे. 

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Died, Thirteen Passengers Injured In Accident Latur News