गाळात फसून एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

विठ्ठल बर्डे सोमवारी मासे पकडण्यासाठी येथील सिंदफना तलावात उतरले. त्यांना पाण्याचा आणि गाळाचा अंदाज न आल्याने ते गाळात फसले.

शिरूर कासार (जि. बीड) - मासे पकडण्यासाठी नदीत उतरलेल्या एकाचा गाळात फसून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (7) तालुक्यातील सिंदफना धरणात घडली. विठ्ठल मारुती बर्डे (वय ४५) असे या व्यक्तीचे नाव आहे. 

विठ्ठल बर्डे सोमवारी मासे पकडण्यासाठी येथील सिंदफना तलावात उतरले. त्यांना पाण्याचा आणि गाळाचा अंदाज न आल्याने ते गाळात फसले आणि पाण्यात बुडुन त्यांचा मृत्यू झाला. संजय किसन बर्डे यांनी मंगळवारी (ता. 8) शिरूर पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: One dies due to get stuck in mud