रस्त्यात अडवून दोन लाखाची लूटमार

प्रल्हाद कांबळे
शुक्रवार, 25 मे 2018

नांदेड - रस्त्यात अडवून दुचाकीवरून खाली पाडून एका फायनान्स कंपनीत वसुली करणाऱ्या व्यक्तीला चाकुचा धाक दाखवून लुटले. रोख रक्कम आणि इतर सामान असा दोन लाखाचा ऐवज दोन अज्ञात चोरट्यांनी काढून घेतला. 

नांदेड - रस्त्यात अडवून दुचाकीवरून खाली पाडून एका फायनान्स कंपनीत वसुली करणाऱ्या व्यक्तीला चाकुचा धाक दाखवून लुटले. रोख रक्कम आणि इतर सामान असा दोन लाखाचा ऐवज दोन अज्ञात चोरट्यांनी काढून घेतला. 

मुदखेड येथील भारत फायनान्समध्ये वसुली प्रतिनीधी म्हणून रामेश्‍वर मोहनराव ढवळे (वय २५) हे आपल्या दुचाकीवरुन उमरी तालुक्यात वसुलीसाठी गेले होते. वसुली करून ते गुरूवारी (ता. २४) दुपारी एकच्या सुमारास बोळसा येथून मदखेडकडे येत असतांना रस्त्यात दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातावर लाकडाने मारून खाली पाडले. यावेळी जवळ जाऊन चाकुचा धाक दाखविला व रोख एक लाख ७६ हजार ३४७ रुपयांसाह टॅब, पॉवर बँक, बायोमेट्रीक मशिन आणि एक मोबाईल असा एक लाख ९७ हजार ४७५ रुपयाचा ऐवज काढून घेतला. तसेच ढवळे यांना मारहाण करून तेथून ते दोघेजण पसार झाले. 

रामेश्‍वर मोहन ढवले यांच्या फिर्यादीवरुन उमरी पोलिस ठाण्यात अज्ञात दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक एस. बी. खेडकर हे करीत आहेत.

Web Title: one get robbed on the road