फलंदाजाने बॅट मारल्याने परतूरला एकाचा मृत्यू 

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

परतूर -  क्रिकेट खेळताना आऊट झाल्यानंतर का हसला म्हणत, तसेच पुडी आणण्यावरून वाद घालत फलंदाजाने डोक्‍यात बॅट मारल्याने गंभीर जखमी झालेल्या एकाचा गुरुवारी (ता. 22) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

परतूर शहरातील लालबहादुर शास्त्री महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी (ता. 20) शहरातील काहीजण क्रिकेट खेळत होते. तेव्हा, संशयित शंकर बाबूराव पवार (वय 20) हा क्रिकेट खेळत असताना आऊट झाला. आऊट झाल्यावर का हसला, म्हणत शंकरने मैदानातील पवन बबनराव तिखे (वय 28) याच्या डोक्‍यात बॅट मारली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पवनला जालन्याला उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान पवन याचा गुरुवारी दुपारी चार वाजता मृत्यू झाला.

या प्रकरणी पवन याचा भाऊ रामेश्‍वर तिखे याच्या फिर्यादीवरून परतूर पोलिस ठाण्यात पवनविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एल. एम. जाधव करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com