उस्मानाबाद : दोन दुचाकींची धडक; तरुण ठार, तिघे जखमी 

One killed, Three Injured in Accident At Yenegoor
One killed, Three Injured in Accident At Yenegoor

येणेगूर (जि. उस्मानाबाद) - मुरूम मोड ते मुरूम रस्त्यावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अन्य तिघे जखमी झाले. ही घटना गुरुवारी (ता. 12) रात्री नऊच्या सुमारास घडली. आकाश बाबूराव राठोड (वय 22, रा. यशवंतनगर मुरूम, मूळ गाव औराद तांडा) असे मृताचे नाव आहे. 

प्राप्त माहितीनुसार, आकाश आणि त्याचा चुलत भाऊ सचिन तेजू राठोड हे दोघे गुरुवारी रात्री मुरूम येथून मुरूम मोड येथे दुचाकीने (एमएच- 25, एई- 2165) जात होते. मुरूम मोड ते सुंदरवाडीदरम्यान (ता. उमरगा) समोरून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीशी (एमएच- 25, ई- 8544) त्यांची धडक झाली. यात आकाशचा जागीच मृत्यू झाला. त्याचा भाऊ सचिनसह नागसेन पांडुरंग गायकवाड आणि खंडप्पा गुरप्पा तेलिकुने (सर्व रा. मुरूम) जखमी झाले. त्यांच्यावर मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. खंडप्पाला पुढील उपचारासाठी उमरगा येथे दाखल करण्यात आले.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिस हेडकॉन्स्टेबल निवृत्ती बोळके, दिगंबर सूर्यवंशी घटनास्थळी दाखल झाले. आकाश हा गुंजोटीवाडी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक असलेल्या बाबूराव राठोड यांचा एकुलता एक मुलगा होता. 

अपघातात महिला ठार 
उमरगा -
उमरगा-चौरस्ता येथे जोगवा मागणाऱ्या महिलेस कंटेनर ट्रकची धडक बसल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. 12) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. याबाबतीत सविस्तर माहिती अशी, की गुलबर्गा येथून चौरस्ताकडे येणाऱ्या कंटेनरने (जीजे- 01, एचटी- 7290) जोगवा मागणाऱ्या महिलेस जोराची धडक दिली. त्यात सुजिद्राबाई नागप्पा जिंगन (वय 63, रा. आळंद, जिल्हा गुलबर्गा) यांचा जोराची धडक दिली. नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून जखमी तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com