दुकानाला आग लागून दीड लाखाचे साहित्य जळाले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

टाकळी राजेराय (ता. खुलताबाद) येथील सय्यद सादात मशिदीजवळ असलेल्या एका दुकानाला गुरुवारी (ता.पाच) मध्यरात्री लागलेल्या आगीत जवळपास दीड लाखाचे नुकसान झाले.

टाकळी राजेराय (जि.औरंगाबाद) ः टाकळी राजेराय (ता. खुलताबाद) येथील सय्यद सादात मशिदीजवळ असलेल्या एका दुकानाला गुरुवारी (ता.पाच) मध्यरात्री लागलेल्या आगीत जवळपास दीड लाखाचे नुकसान झाले.

काही दिवसांपूर्वीच गावातील आरेफ जब्बार पठाण यांनी उसनवारी, कर्ज काढून मोबाइल दुरुस्तीसह पानटपरी सुरू केली होती. नेहमीप्रमाणे आरेफ पठाण हे रात्री अकरा वाजेदरम्यान दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर मध्यरात्री एक ते दीड वाजेदरम्यान धूर निघत असल्याचे दुकानाशेजारच्या व्यक्‍तीस दिसले. त्याने लगेच शहानिशा करत आरेफ पठाण यांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पठाण यांनी दुकानाकडे धाव घेतली; परंतु तोपर्यंत दुकानातील लॅपटॉप, रिपेरिंगसाठी आलेले मोबाईल, दुरुस्तीचे साहित्य, फर्निचर जळून खाक झाले. या आगीत पठाण यांचे अंदाजे दीड लाखाचे नुकसान झाले.

ग्रामस्थांतर्फे आर्थिक मदत
आरेफ पठाण यांची घरची परिस्थिती हलाखीची असून उसनवारी, उधारी, कर्ज काढून त्यांनी दुकान सुरू केले होते. उदनिर्वाहासाठी त्यांना दुसरे कोणतेच साधन नसल्यामुळे ग्रामस्थातर्फे त्यांना सतरा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One lack 50 thousand Loss In Fire