महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रात घरफोड्या करणारी टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

  • आंध्रात घरफोड्या करणारी टोळी जेरबंद
  • स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
  • 50 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

लातूर : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यात घरफोडी करणारी अट्टल टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाच्या हाथी लागली आहे. या प्रकरणात पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील 50 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी रविवारी जप्त केला.

एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत 3 जानेवारीला दिवसा घरफोडी झाली होती. या प्रकरणी सुधाकर तुकाराम होळकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांचे घर बंद असताना चोरट्यांनी कुलूप तोडून घरात ठेवलेले सोन्याचे गंठण आणि रोख रक्कम असा एकुण एक लाख 53 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना सुमीत दगडू गर्गेवाड (रा. मळवटी रस्ता) याने साथीदारासोबत ही घरफोडी केल्याची माहिती मिळाली. त्यानूसार पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवत पाचही जणांना शिताफीने पकडले. 

त्यात सुमीतसह दगडू बालाजी गर्गेवाड, आकाश उर्फ भावड्या बाबुराव कांबळे, संजू उर्फ संभ्या विक्रम बंधवाडे (रा. सर्वजन मळवटी रस्ता), हणमंत दिगांबर येटेवाड (रा. भाटसांगवी) या आरोपींचा समावेश आहे. त्यांच्याकडे गुन्ह्याची विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्या असल्याचे कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम जप्त केली. या टोळीकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे.
 

Web Title: one roobbers gang arrested by Local crime branch of latur the gang active in Maharashtra Karnataka Andhra Pradesh

टॅग्स