हिंगोली : 313 गावांमध्ये एक गाव एक गणपती!

One village One Ganapati In Villages Of Hingoli District
One village One Ganapati In Villages Of Hingoli District

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यांमध्ये 1233 ठिकाणी गणेशमूर्तीची उत्साहात स्थापना करण्यात आली असून 313 गावांमधून एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यात मागील पंधरादिवसा पासून गणेश मूर्ती स्थापनेची धूम चालू होती. गुरुवारी (ता.13) सकाळपासूनच बाजारपेठेत गणेशमूर्ती खरेदीसाठी अबालवृद्धांची गर्दी झाली होती. दुपारपासून गणेशमुर्ती स्थापना मिरवणुका सुरू झाल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत या मिरवणुका सुरू होत्या. जिल्ह्यात 1233 ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना झाली आहे. यामध्ये हिंगोली पोलिस ठाण्यांतर्गत 93 ठिकाणी गणेशमूर्ती स्थापना झाली आहे. औंढा पोलिस ठाण्यांतर्गत 93, कळमनुरी 113, वसमत शहर 92, सेनगाव 124, आखाडा बाळापुर 109, हट्टा 145, कुरुंदा 80, हिंगोली ग्रामीण 94, गोरेगाव 94, नरसी नामदेव 54, बासंबा 51, वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत 91 ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना झाली आहे. सर्वच ठिकाणी शांततेत गणेशमूर्ती स्थापना झाली आहे.

दरम्यान एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी शांतता समितीच्या बैठकीमध्ये केले होते. त्यानुसार जिल्ह्यात 313 ठिकाणी एक गाव एक गणपती स्थापन झाली आहेत यामध्ये औंढा पोलिस ठाण्यांतर्गत 24 गावात, कळमनुरी पोलिस ठाण्यांतर्गत 56, सेनगाव  अठरा आखाडा बाळापुर 40, हट्टा 30, कुरुंदा 38, हिंगोली ग्रामीण 29, गोरेगाव 22, नरसी नामदेव 14, बासंबा 24 , तर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याअंतर्गत 23 गावांमध्ये एक गाव एक गणपती स्थापन करत आला आहे. या उपक्रमामुळे पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण काही प्रमाणात का होईना कमी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com