लागवडीसाठीचा कांदा आता खाण्यासाठी 

उमेश वाघमारे 
बुधवार, 11 डिसेंबर 2019

जालना - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. 10) शेतकऱ्याचा केवळ वीस क्विंटल कांदा आला. या कांद्याला सर्वाधिक सहा हजार, सर्वांत कमी तीन हजार, तर सरासरी साडेचार हजार रुपये भाव मिळाला. विशेष म्हणजे लागवडीसाठीचा लहान आकाराचा आणि पाते फुटलेला कांदाही खाण्यासाठी विक्री होऊ लागला आहे. 

जालना - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. 10) शेतकऱ्याचा केवळ वीस क्विंटल कांदा आला. या कांद्याला सर्वाधिक सहा हजार, सर्वांत कमी तीन हजार, तर सरासरी साडेचार हजार रुपये भाव मिळाला. विशेष म्हणजे लागवडीसाठीचा लहान आकाराचा आणि पाते फुटलेला कांदाही खाण्यासाठी विक्री होऊ लागला आहे. 

कां​द्याच्या आवकीची मागविली माहिती 
सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत कांद्याच्या भावाची चर्चा आहे. कांद्याचे भाव वाढल्याने शासनाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून चक्क बाजार समित्यांमधील कांद्याच्या आवकची माहिती मागवली आहे. साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही पुरवठा विभागाला शासनाने दिले आहेत. त्यामुळे शासन कांद्याच्या भावावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे; मात्र सध्या कांद्याच्या आवकचाच वांधा झाला आहे. त्यामुळे आहे त्या कांद्याचे भाव वाढल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : जालना बनलाय गावठी पिस्तुलवाल्यांचा अड्डा 

कांद्याची आवक घटलेलीच 
कांद्याचे भाव वाढले की सर्वांच्या डोळ्यांत पाणी येते. कांद्याचे भाव वाढले की सोशल मीडियावर शेतकऱ्यांच्या हिताच्या आणि वाढीने त्रस्त झालेल्यांचे व्हिडिओ शेअर होतात; मात्र सध्या कांद्याचे वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे कांद्याची होत असलेली कमी आवक. परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी कांद्याच्या पिकाला फटका बसला. परिणामी उत्पादनावर परिणाम झाला. त्यातच व्यापाऱ्यांकडून साठेबाजीची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. 10) केवळ वीस क्विंटल शेतकऱ्याचा कांदा आला. या कांद्याला सर्वाधिक सहा हजार, सर्वांत कमी तीन हजार, तर सरासरी साडेचार हजार रुपये भाव मिळाला. मुळात शेतकऱ्याचा कांदा परतीच्या पावसाने नासून गेल्याने कांद्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे आहे त्या कांद्याला भाव आला आहे. हे चित्र पुढील काही महिने कायम राहणार आहे. या हंगामामध्ये बाजारात लाल कांद्याची मोठी आवक असते; मात्र परतीच्या पावसाने यंदा शेतकऱ्यांचा कांदा सडला. त्यामुळे लाल कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आणि बाजारात कांद्याची आवक कमी झाली. त्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. 

सात ट्रक कांदा लागवडीचा 
नगर, नाशिक, लासलगाव, सोलापूर कांदा मार्केटमध्ये न चालणाऱ्या बीजलागवडीच्या सात ट्रक कांद्याची आवक झाली. यातील 150 क्विंटल बीजलागवड कांद्याची लिलाव झाला. या बीजलागवड कांद्याला सर्वाधिक तीन हजार, सर्वात कमी दीड हजार, तर सरासरी दोन हजार रुपये भाव मिळाला. या बीजलागवड कांद्यापैकी व्यापाऱ्यांकडून अनेकदा चांगला कांदा खरेदी केला जातो. त्यानंतर किरकोळ बाजारात तोच कांदा खाण्यासाठी म्हणून कमी-अधिक किमतीमध्ये विक्री केला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: onion in Jalna