कांदा चाळीचे अनुदान अंगणवाडी सेविकेला

सुषेन जाधव
रविवार, 8 जानेवारी 2017

औरंगाबाद - भिवगाव (ता. वैजापूर) येथील एका शेतकऱ्याला राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 87 हजार 500 रुपये कांदा चाळ अनुदान मंजूर झाले. मात्र, कृषी विभागाने या अनुदानाची रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या बॅंक खात्यावर जमा करण्याऐवजी अंगणवाडी सेविकेच्या खात्यावर जमा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झाला.

वर्ष 2016-17 या वर्षांसाठी कृषी विभागाने वैजापूर तालुक्‍यात 64 शेतकऱ्यांना 50 लाख 27 हजार 99 रुपये अनुदानाचे वितरण केले. यासाठी 791 प्रस्ताव आले होते. लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून लाभार्थींची निवड करण्यात आली. यात भिवगाव येथील विनोद गायके या शेतकऱ्याच्या नावाचीही चिठ्ठी होती. चिठ्ठी नाव आलेल्या इतर शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले; पण गायके यांच्या खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे त्यांनी संबंधितांकडे चौकशी करून पाठपुरावा केला. त्यावर त्यांच्या नावावरचे 87 हजार 500 रुपयांचे अनुदान एका अंगणवाडी सेविकेच्या खात्यात जमा झाल्याचे उघड झाले.

कृषी विभागाची सावरासावर
हा प्रकार उघड झाल्यानंतर कृषी विभागाने जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकाला पत्र देऊन अंगणवाडी सेविकेच्या खात्यात चुकीने जमा झालेले अनुदान संबंधित लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यात वळविण्याची विनंती केली. त्या आधारे शाखा व्यवस्थापकाने काही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग केली; परंतु उर्वरित रकमेसाठी शेतकऱ्याला बॅंक आणि कृषी कार्यालयाकडे खेटे घ्यावे लागत आहेत.

जो प्रकार झाला आहे, त्याबद्दल माझ्याकडे माहिती नाही. आमच्याकडे शेकड्याने लाभार्थी असतात. सगळ्यांचे रेकॉर्ड सोबत घेऊन फिरता येत नाही. तुम्ही एसएमएस करा, मी तपासून बघतो.
- संजीव पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, औरंगाबाद.

Web Title: onion subssidy anganwadi employee