ऑनलाइन पीएफ विड्रॉवलमध्ये त्रुटी

विकास देशमुख
मंगळवार, 31 जुलै 2018

औरंगाबाद - पीएफ विड्रॉवलसाठी ‘फॉर्म-१५ जी किंवा एच’ आवश्‍यक आहे; मात्र ऑनलाइनमध्ये हा फॉर्मच उपलब्ध नाही. त्यामुळे अनेकांना नाइलाजाने ऑफलाइन पद्धतीने पीएफ काढावा लागत आहे. दरम्यान, ज्यांनी ‘फॉर्म-१५ जी किंवा एच’विना ऑनलाइन आवेदनपत्र भरले, त्यांच्या हक्काच्या रकमेतून टीडीएस कपात होत आहे. 

पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत नोकरी सोडली आणि पीएफ रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर ती काढण्यासाठी संबंधिताला फॉर्म-१९ व १०-सीसोबतच फॉर्म-१५ जी भरून द्यावा लागतो. ज्या पीएफ खातेधारकाचे वय ६० पेक्षा अधिक असेल त्याला फॉर्म-१५ एच भरून द्यावा लागतो; पण हा व्यवहार ऑनलाइन करताना फॉर्म-१५ जी व एच हे दोन्ही फॉर्म उपलब्ध नाहीत. त्यामुळे नाइलाजाने अनेकजण आपला पीएफ ऑफलाइन काढत आहेत.

असा बसतो फटका
पाच वर्षांपूर्वी नोकरी सोडावी लागली आणि पीएफची रक्कम ५० हजारांपेक्षा अधिक असेल तर तो काढताना फॉर्म-१५ जी किंवा एच अनिवार्य आहे. तो नसेल आणि खात्याला पॅन लिंक असेल तर जमा रकमेतून १० टक्के आणि पॅन लिंक नसेल तर ३० ते ३४ टक्के टीडीएस कपात होते. विशेष म्हणजे, ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांसाठी फॉर्म-१५ जी व एच ही सेवाच उपलब्ध नाही.

‘फॉर्म-१५ जी व एच’ ऑनलाइन उपलब्ध नाही. ही प्रक्रिया ऑफलाइनमध्येच उपलब्ध आहे. पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत नोकरी केली आणि पीएफ ५० हजारांपेक्षा अधिक झाला तर ऑफलाइन पद्धतीने टीडीएस भरून तो काढता येतो. 
- अमरसिंग, जनसंपर्क अधिकारी, पीएफ कार्यालय

Web Title: Online-PF-Withdraw error

टॅग्स